बुधवार, २३ ऑक्टोंबर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून शिवसेनेची पहिली उमेदवारी यादी जाहीर झाली असून पहिल्या यादीत ४५ जणांचा समावेश आहे. मुख्यमंत्री शिंदे स्वतः कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे. 
याशिवाय पहिल्या यादीत गुलाबराव पाटील, संजय राठोड, संतोष बांगर, अर्जुन खोतकर, अब्दुल सत्तार, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, सुहास कांदे, दादा भुसे, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, भरत गोगावले, तानाजी सावंत, शहाजी बापू पाटील, शंभुराजे देसाई, दीपक केसरकर आदी उमेदवारांचा प्रमुख उमेदवारांत समावेश आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघाची जागा गेल्या अनेक वर्षापासून ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहे. शिवसेना फुटीनंतर ही जागा मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे असल्याचे म्हटले जाते. शिंदे गटाकडे प्रबळ उमेदवार नसल्याने भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील देखील या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संगमनेरची ही जागा नक्की कोणाकडे असा देखील संभ्रम निर्माण झाला आहे.
शिवसेनेने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत संगमनेरचे नाव नसल्याने या जागेचा संभ्रम अद्यापही कायम आहे.
बघा शिवसेनेच्या उमेदवारांची यादी…





