शनिवार, २६ ऑक्टोबर २०२४
मेष – रोजची दैनंदिन कामे लवकर पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढल्यामुळे आपल्या महत्वाच्या कामांना वेळ देऊ शकाल. व्यवसायात काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.
वृषभ – नोकरीमध्ये हाताखालील लोकांचे तसेच वरिष्ठांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळेल. केलेल्या नियोजनात काही बदल करावे लागतील. प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे जरुरीचे.
मिथुन – कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाहमधील अडथळे दूर होतील. तसेच संततीचे असलेले प्रश्न मार्गी लागतील. आप्तेष्ट व नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. हितशत्रूवर विजय मिळवाल.
कर्क – नियोजनाद्वारे हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. परंतु त्यासाठी कार्यमग्न राहणे आवश्यक ठरेल. तसेच कोणाबरोबरही वाद- विवाद करू नयेत. कलहसदृश्य घटनांपासून अलिप्त राहा.
सिंह – जिद्द व चिकाटीने आपल्या समोरील कामे पूर्ण कराल. नोकरीमध्ये तसेच व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. आयत्या वेळेस काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.
कन्या – कौटुंबिक जीवनात सुसंवाद व समन्वयाने कार्य साधारण व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसूल झालेल्या कारणांनी आर्थिक परिस्थिती सुधारेल. नवीन उधारी करू नका.
तुळ – आपला आत्मविश्वास व मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहून कुटुंब परिवारात एखादी महत्त्वाची सकारात्मक वार्ता मिळेल. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील.
वृश्चिक – महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. काही कारणास्तव जवळचा तसाच दुरचा प्रवास घडेल. प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. तसेच महत्त्वाची कागदपत्रे जपा.
धनु – एखादा अप्रिय निर्णय स्वीकारावा लागल्यामुळे मनोबल कमी होईल परंतु नाराज होण्याची गरज नाही. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील आप्तेष्ट नातेवाईक तसेच मित्र मंडळ यांच्यामध्ये वेळ जाईल.
मकर – नोकरीमध्ये अथवा व्यवसाय-धंद्यात अनुकूल वातावरण राहील. मात्र आपल्या बोलणे, वागण्यावर नियंत्रण आवश्यक आहे. रागावर नियंत्रण ठेवून कोणालाही अपमानास्पद वागणूक देऊ नका.
कुंभ – स्वतःच्या कार्यक्षेत्रात उत्तम स्थिती राहून आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. निरनिराळ्या नवीन संधींचा लाभ होईल. मात्र शांतपणे आणि पूर्ण विचारांती निर्णय घेण्याची आवश्यकता.
मीन – कौटुंबिक सुख लाभून जोडीदाराचा सल्ला उपयुक्त ठरेल. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे हितकारक ठरेल.

