Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी खासदार सुजय विखेंच्या सभेत जयश्री थोरात अवमानकारक वक्तव्य प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे, सुजय विखे यांना तालुका बंदी… वसंत देशमुख व विखेंवर गुन्हे दाखल करून अटक करा : संतप्त जमावाची मागणी
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी खासदार सुजय विखेंच्या सभेत जयश्री थोरात अवमानकारक वक्तव्य प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे, सुजय विखे यांना तालुका बंदी… वसंत देशमुख व विखेंवर गुन्हे दाखल करून अटक करा : संतप्त जमावाची मागणी

पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन, संगमनेरात तणावाची स्थिती, सर्वत्र निषेध
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/10/2024Updated:26/10/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, २६ ऑक्टोबर

संगमनेर – सुसंस्कृत राजकारणाची राज्याला दिशा देणाऱ्या संगमनेर तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुजय विखे यांनी सभा घेऊन भडक वक्तव्य केली. यातूनच काही लोकांना प्रोत्साहन मिळाल्याने युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्यासह महिला भगिनींविरुद्ध अत्यंत गलिच्छ भाषेत वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुख व सुजय विखे यांना तातडीने अटक करा या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले याचबरोबर सुजय विखे यांना संगमनेर तालुका प्रवेश बंदी करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला.

महिलांचा अपमान करणारे वसंत देशमुख व सुजय विखे यांना तातडीने अटक करा, या मागणीसाठी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याबाहेर मोठे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, राहता काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे, श्रीरामपूरचे उमेदवार हेमंत ओगले, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षा रुपवते, इंद्रजीत थोरात, सचिन गुजर, करण ससाने, दिपाली ससाने, राहुरीचे बाळासाहेब आढाव, इंद्रजीत थोरात, माजी नगरसेवक गोरख कुटे व सोमेश्वर दिवटे, आरपीआय बाळासाहेब गायकवाड, ठाकरे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांच्यासह संगमनेर तालुक्यातील महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व नागरिक उपस्थित होते.

डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल धांदरफळ येथील सभेचे अध्यक्ष असलेले व वयाची ऐंशी गाठलेल्या वसंत देशमुख याची जीभ घसरल्याने बेताल वक्तव्य केले. यानंतर सुजय विखे यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता पुन्हा टीका केली. ही टीका सुरू असताना संगमनेर तालुक्यात प्रचंड मोठी संतापाची लाट निर्माण झाली. हजारो महिला व कार्यकर्त जमा झाले. या सर्वांनी घुलेवाडी येथील ग्रामीण पोलीस स्टेशनवर मोर्चा नेला व दोषींना तातडीने अटक करावी, अशी मागणी केली परंतु पोलीस प्रशासनावर दबाव असल्याने रात्रभर हजारो लोक पोलीस स्टेशन समोर थांबूनही पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता. त्यानंतर सकाळी चार गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

सुजय विखेंना तालुका बंदीचा एकमुखी ठराव… संगमनेर तालुका हा सुसंस्कृत आहे. मात्र येथे येऊन सातत्याने भडकाऊ भाषणे करून समाजामध्ये द्वेष पसरवणाऱ्या आणि महिलांचा अवमान करणाऱ्या सुजय विखे यांना संगमनेर तालुक्यात कोणत्याही गावात प्रवेश दिला जाणार नाही. याचबरोबर त्यांच्या समर्थकांनाही प्रवेश दिला जाणार नाही. असा एकमुखी ठराव संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावांमधील नागरिक व महिलांनी मोठ्या टाळ्यांच्या गजरात केला असून या घटनेचे राज्यभर पडसाद उमटल्याने राज्यभरातून या घटनेचा निषेध होत आहे.

यांनी केल्या प्रतिक्रिया व्यक्त…

  • थोरात परिवार हा सुसंस्कृत परिवार आहे या परिवाराचा सर्व राज्य आदर करत आहे. परंतु वाईट प्रवृत्ती काय असते ती आता संगमनेरने नव्हे तर जिल्ह्याने अनुभवली आहे. महायुतीच्या उमेदवारांचा डिपॉझिट जप्त करून सर्वांनी निषेध करावा. – खासदार भाऊसाहेब वाकचौरे.
  • ही वाईट संस्कृती राहता तालुक्याला माहित आहे. विरोधी बोलले की तंगड्या तोडल्या जातात. महिलांबद्दल इतके वाईट बोलताना यांना लाज कशी वाटत नाही. दक्षिण नगरमध्ये जनतेने यांना का पराभूत केले हे आता लोकांना कळले आहे. अशा प्रवृत्तीला साथ देणारे सुद्धा वाईट आहेत. या सर्वांचा एकजुटीने बंदोबस्त करा. आमदार बाळासाहेब थोरात हे राज्यांमध्ये जिल्ह्याचे नाव मोठं करत आहे. ते राज्य सांभाळतील आपण तालुका आणि जिल्हा सांभाळून अशा वाईट प्रवृत्तींना वेळच रोखु. – प्रभावती घोगरे, काँग्रेस उमेदवार शिर्डी.
  • सुसंस्कृत राजकारण ही आपली परंपरा आहे. मात्र कुणी अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावत असेल तर संगमनेर तालुका हे सहन करणार नाही. लोकशाही आहे, मते मांडण्याचा अधिकार आहे. मात्र शिर्डी मतदारसंघातील दडपशाही आणि हुकूमशाही येथे चालणार नाही. संगमनेरचा नागरिक यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. – डॉ. सुधीर तांबे माजी आमदार.
  • कालची घटना ही अत्यंत दुर्दैवी असून आरोपींना पकडण्यासाठी बारा पथके नियुक्त केली आहे. सर्व जनभावनेचा आदर करून आरोपीवर योग्य कारवाई केली जाईल. – राकेश ओला, जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर.

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,474
अवमानकारक वक्तव्य आंदोलन जयश्री थोरात वसंत देशमुख संगमनेर तालुका पोलीस सुजय विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.