Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अमेरिकेतील जागतिक विमा परिषदेसाठी आदित्य कडलग यांची निवड
सामाजिक

अमेरिकेतील जागतिक विमा परिषदेसाठी आदित्य कडलग यांची निवड

पुढील वर्षी होणार परिषद
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/10/2024Updated:29/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, २९ ऑक्टोबर

संगमनेर – टाटा एआयए लाईफ इ्शुरन्स कंपनीचे अभिकर्ता आदित्य सुनील कडलग यांना जागतिक पातळीवरील प्रतिष्ठेचा कोर्ट ऑफ द टेबल (सीओटी) हा सन्मान प्राप्त झाला आहे.

पुढील वर्षी २२ ते २५ जून २०२५ या कालावधीत होणाऱ्या जागतिक विमा परिषदेसाठी मियामी बीच, फ्लोरिडा या अमेरिकेच्या युनायटेड स्टेट्समधील किनारपट्टीवरील शहरात होणाऱ्या जागतिक विमा परिषदेत ते सहभागी होतील.

आदित्य यास कोर्ट ऑफ द टेबल होण्यासाठी वडील कडलग इन्व्हेस्टमेंटचे संस्थापक सुनील कडलग यांच्यापासून प्रेरणा मिळाली. सुनील कडलग हे गेल्या २८ वर्षापासून जीवन विमा सल्लागार, १५ वर्षांपासून म्युच्युअल फंड वितरक व आरोग्य विमा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.

येथील कडलग इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून त्यांनी या क्षेत्रात अतिशय पारदर्शक व प्रामाणिक सेवा व कार्य केले आहे. प्रामाणिकपणा लोकांच्या हिताचा विचार आणि जिद्द या माध्यमातून ग्राहकांच्या जीवनातील उद्दिष्टे प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना प्रतिष्ठेचे

इंडियन ग्लोरी अवॉर्ड्सचे राष्ट्रीय गुणवत्ता पारितोषिक २०२३ हा आर्थिक नियोजन क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पुरस्कारही प्राप्त झालेला आहे.

कोविड महामारीच्या दरम्यान कडलग यांनी अनेक कुटुंबांना विमा मृत्यू दावे प्राप्त करून दिलेले आहेत. आरोग्य विम्याच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना कोविड क्लेम प्राप्त करून देऊन आधार दिलेला आहे. समाजामध्ये अर्थसाक्षरता निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्रभर ते व्याख्याने देतात आणि वृत्तपत्रांमधून लेखनही करतात.

जवळे कडलग येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक कार्यवाह , संगमनेर येथील रोटरी आय केअर ट्रस्टचे विश्वस्त, रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे संचालक अशा विविध संस्थांच्या माध्यमातून सुनील कडलग हे सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत.

जागतिक विमा परिषदेसाठी पात्र होण्यासाठी आदित्य कडलग यास टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स कंपनी नाशिकचे शाखाधिकारी धनंजय पाटील, चीफ लाईफ असोसिएट सुरज वानखेडे, सामजिक कार्यकर्ते व कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुनील कडलग यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

आदित्य कडलग यांनी २०२३ मध्ये जीवन विमा या क्षेत्रात पदार्पण केले पहिल्याच वर्षी त्यांनी एमडीआरटी हा सन्मान प्राप्त केला आणि सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी जानेवारी ते डिसेंबर २०२४ या एकाच वर्षात सलग तीनदा एमडीआरटी करून कोर्ट ऑफ द टेबल हा सन्मान प्राप्त केला आहे.

आदित्य यास सीओटी हा बहुमान प्राप्त झाल्याने कडलग इन्व्हेस्टमेंटची दुसरी पिढी या क्षेत्रात कार्यरत झाल्याचा संदेश दिला गेला आहे.

संगमनेर शहरातील जागतिक विमा क्षेत्रातील पहिले सीओटी म्हणून आदित्यच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 853
आदित्य कडलग कडलग इन्व्हेस्टमेंट सुनील कडलग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.