Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर न्यायालयाचा मोठा निकाल! वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसवणाऱ्या चालकाला दिली ‘ही’ शिक्षा

07/10/2026

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी खासदार असलेल्या भाजपच्या बड्या दिग्गज नेत्यांच निधन
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी खासदार असलेल्या भाजपच्या बड्या दिग्गज नेत्यांच निधन

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/11/2024Updated:14/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, १४ नोव्हेंबर

नाशिक – राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षाचे दिग्गज नेते आपल्या पक्षाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले असताना भारतीय जनता पक्षाच्या गोटातून दुःखद बातमी समोर आली आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार असलेले भाजप नेते हरिश्चंद्र चव्हाण यांचे आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कॉलेज रोडवरील पाटील लेन नंबर दोन येथील त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. यामुळे या मतदारसंघात दुःखद वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून चव्हाण यांची प्रकृती बरी नव्हती. अखेर आज सकाळी त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी कलावती चव्हाण, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

पेठ-सुरगाणा या आदिवासी मतदारसंघाच्या राजकारणात सुरुवातीला अपक्ष म्हणून उतरलेले हरिश्चंद्र चव्हाण पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून ते एकदा खासदार तर भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ते सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

चव्हाण यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे अनेक वर्ष प्रतिनिधित्व केले. पंचायत समिती, जिल्हा परिषदेतही त्यांनी विविध पदे भूषवली. दिंडोरीचे खासदार असताना भाजपचे सरकार वाचवण्यासाठी आजारपणात ते एअर अँब्युलन्सने दिल्लीला गेले होते.

भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या चव्हाण यांना २०१९ च्या निवडणुकीमध्ये पक्षाने उमेदवारी नाकारली होती. मात्र तरी देखील ते पक्षासोबत एकनिष्ठ होते.

अशी राहिली कारकीर्द…

हरिश्चंद्र चव्हाण यांनी २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार भारती पवार यांचा तब्बल २ लाख ४७ हजार मतांनी पराभव केला होता. नंतरच्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने चव्हाण यांना उमेदवारी नाकारत भारती पवार भारतीय जनता पक्षाची उमेदवारी दिली होती. त्यांनी या मतदार संघातून विजय मिळविला होता. नंतर पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात आरोग्य राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली होती.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,566
निधन भारतीय जनता पक्ष हरिश्चंद्र चव्हाण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

फडणवीसांना थेट ललकारलं! ३ महिने जेलमध्ये टाकलं तरी पुन्हा येईन; ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात एल्गार, दादरमध्ये उद्या ठिय्या

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर न्यायालयाचा मोठा निकाल! वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसवणाऱ्या चालकाला दिली ‘ही’ शिक्षा

By Annant Ppangarkar07/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महामार्गावरून पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत निष्काळजीपणे कंटेनर घुसवून चार जणांना चिरडून…

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026

बुधवार, ०७ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

07/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.