Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बिबट्यांचा वावर असलेल्या भागांत वनविभागाची यंत्रणा सज्ज ठेवा: आमदार अमोल खताळ

21/11/2026

आज शनिवार २१ नोव्हेंबर २०२६ — आजचा तुमचा दिवस कसा असेल

21/11/2026

बेकायदेशीर मुरूम वाहतूक व जीवे मारण्याचा प्रयत्न प्रकरणी टोळीवर अप्पर पोलीस अधीक्षकांची ‘मकोका’च्या धर्तीवर बीएनएस कलम १११ अन्वये कारवाई

20/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बिबट्यांचा वावर असलेल्या भागांत वनविभागाची यंत्रणा सज्ज ठेवा: आमदार अमोल खताळ
बैठक

बिबट्यांचा वावर असलेल्या भागांत वनविभागाची यंत्रणा सज्ज ठेवा: आमदार अमोल खताळ

वनविभागाने वन्यजीव संरक्षणासह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने दक्ष राहून काम करावे, असेही आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
मानव-बिबट संघर्षाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी वनविभागाने अधिक सतर्क राहून प्रभावी उपाययोजना कराव्यात. बिबट्यांचा वावर असलेल्या भागांमध्ये आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासह आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
संगमनेर येथील सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्या कार्यालयात शुक्रवार (दि. २०) वनविभागाच्या कामकाजाचा आमदार खताळ यांनी आढावा घेतला. या बैठकीत प्रस्तावित वनभवन इमारतीचे काम तसेच निझर्णेश्वर, पेमगिरी आणि बाळेश्वर येथील वनपर्यटन विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित कामांची सद्यस्थिती जाणून घेत वनविभागाच्या विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.
मानव-बिबट संघर्ष रोखण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वनविभागाला आवश्यक साहित्य व साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली होती. यामध्ये बिबट बचाव वाहने, ड्रोन, बंदुका आणि पिंजऱ्यांचा समावेश आहे. बिबट्यांचा वावर असलेल्या भागांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने बचावकार्य राबविणे यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचा प्रभावी वापर करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. मानव-बिबट संघर्षाच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाने समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.
बिबट्यांना सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी प्रशिक्षित असलेल्या संगमनेरच्या बिबट बचाव पथकाने केलेल्या कार्याची दखल घेत या पथकाचा सत्कार करण्यात आला. बिबट्यांचा वावर असलेल्या परिसरात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत प्रशिक्षित पथकाची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे या पथकाने आवश्यक प्रशिक्षण, दक्षता आणि उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने आपले कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
जंगल परिसरातील पाणवठे सुस्थितीत ठेवणे, पाण्याची उपलब्धता तपासणे आणि वन्यजीवांना पाण्यासाठी मानवी वस्त्यांकडे येण्याची वेळ कमी करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यावरही भर देण्यात आला. वनविभागाने वन्यजीव संरक्षणासह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने दक्ष राहून काम करावे, असेही आमदार अमोल खताळ यांनी सांगितले. या बैठकीस सहाय्यक वनसंरक्षक अमरजित पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन ताम्हाणे, नम्रता हिरे यांच्यासह वनविभागातील सर्व वनपाल, वनरक्षक, वनमजूर आणि कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 56
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरकरांच्या सुरक्षेसाठी तांबे ॲक्शन मोडमध्ये; गुन्हेगारांचा बंदोबस्त करा, पोलिसांना सक्त ताकीद! पोलिसांच्या मदतीला पालिकेचे ‘रक्षक दल’; विनानंबर प्लेट वाहनांवर कारवाईचे आदेश

17/11/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

बिबट्यांचा वावर असलेल्या भागांत वनविभागाची यंत्रणा सज्ज ठेवा: आमदार अमोल खताळ

By Annant Ppangarkar21/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- मानव-बिबट संघर्षाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी वनविभागाने अधिक सतर्क राहून प्रभावी…

आज शनिवार २१ नोव्हेंबर २०२६ — आजचा तुमचा दिवस कसा असेल

21/11/2026

बेकायदेशीर मुरूम वाहतूक व जीवे मारण्याचा प्रयत्न प्रकरणी टोळीवर अप्पर पोलीस अधीक्षकांची ‘मकोका’च्या धर्तीवर बीएनएस कलम १११ अन्वये कारवाई

20/11/2026

This is demo post

20/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.