Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

07/10/2026

संगमनेर न्यायालयाचा मोठा निकाल! वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसवणाऱ्या चालकाला दिली ‘ही’ शिक्षा

07/10/2026

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट
बैठक

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

आमदार खताळ यांनी विशिष्ट ठेकेदारांचे हित जपणाऱ्या अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांची चौकशी करण्याची मागणी केली. या मागणीची तात्काळ दखल घेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता थिटे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश प्रधान सचिवांना दिले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेर तालुक्यातील तीव्र दुष्काळजन्य परिस्थिती आणि आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेता, प्रलंबित असणाऱ्या सर्व पाणीपुरवठा योजनांची कामे नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करा, असे कठोर निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत.
आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष आढावा बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, मुख्य अभियंता प्रशांत भामरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती देशपांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यातील घुलेवाडी, गुंजाळवाडी, तळेगाव, निमोण, सुकेवाडी, खांजापूर, चंदनापुरी, झोळे, हिवरगाव पावसा, वरवंडी, कासारा दुमाला आणि मांडवे आदीसह विविध गावांमधील पाणीपुरवठा योजनांच्या रखडलेल्या कामांकडे शासनाचे लक्ष वेधले. केवळ कागदावर योजना न दाखवता प्रत्यक्षात जनतेला पाणी मिळाले पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडत त्यांनी अपूर्ण कामे, निधीची टंचाई आणि थकीत वीजबिलांचा प्रश्न बैठकीत लावून धरला.
आमदार खताळ यांनी विशिष्ट ठेकेदारांचे हित जपणाऱ्या अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांची चौकशी करण्याची मागणी केली. या मागणीची तात्काळ दखल घेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता थिटे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश प्रधान सचिवांना दिले. याशिवाय तालुक्यातील अपूर्ण कामे आणि अतिरिक्त निधीच्या अंदाजपत्रकांचे राज्यस्तरीय यंत्रणेमार्फत ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तपासात दोषी आढळणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
थकीत वीजबिलांमुळे पाणीपुरवठा योजना बंद पडू नयेत यासाठी आगामी मंत्रिमंडळ बैठकीत धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही यावेळी मंत्र्यांनी दिले. राजापूर परिसराला स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा करणे तसेच ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सुटलेल्या सर्व वाड्या-वस्त्यांचा समावेश करून सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. संगमनेर तालुक्यातील प्रत्येक घटकाला पिण्याचे पाणी मिळवून देण्यासाठी हा पाठपुरावा अविरत सुरू राहील, असा विश्वास खताळ यांनी व्यक्त केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 249
अमोल खताळ गुलाबराव पाटील पाणी योजना बैठक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

By Annant Ppangarkar07/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील तीव्र दुष्काळजन्य परिस्थिती आणि आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईची भीषणता…

संगमनेर न्यायालयाचा मोठा निकाल! वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसवणाऱ्या चालकाला दिली ‘ही’ शिक्षा

07/10/2026

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.