Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर न्यायालयाचा मोठा निकाल! वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसवणाऱ्या चालकाला दिली ‘ही’ शिक्षा

07/10/2026

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तबला अबोल झाला… ‘वाह ताज’ नही रहे! तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन
महाराष्ट्र संवाद विशेष

तबला अबोल झाला… ‘वाह ताज’ नही रहे! तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन

चित्रपटातही केले होते काम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/12/2024Updated:16/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार १६ डिसेंबर
न्यूयॉर्क – जगप्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांची वयाच्या ७३ व्या वर्षी कॅलिफोर्नियामधील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये उपचार सुरू असतानाच रविवारी रात्री प्राणज्योत मालवली. त्यामुळे अखेरीस आता तबला अबोल झाला आहे.
रविवारी सकाळी त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयविकाराशी संबंधित आजारामुळे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र, रविवारी रात्री त्यांची तब्येत आणखीन बिघडली आणि त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
पद्मविभूषण, ग्रॅमीसह विविध पुरस्कारांनी सन्मानित …
उस्ताद झाकीर हुसेन यांना १९८८ मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण आणि २०२३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळाले होते.
उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव उस्ताद अल्लाह रक्खा कुरेशी आणि आईचे नाव बीवी बेगम होते. झाकीर यांचे वडीलही तबलावादक होते. झाकीर हुसेन यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल स्कूलमधून झाले. याशिवाय मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. झाकीर हुसेन यांनी वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला होता. १९७३ मध्ये त्यांचा पहिला अल्बम ‘लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड’ प्रकाशित झाला होता. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी मैफिलीत सादर केलेल्या तबला वादनाला पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर खान, बिस्मिल्ला खान, पंडित शांता प्रसाद आणि पंडित किशन महाराज यांची दाद मिळाली होती.
२०१६ मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी झाकीर हुसेन यांना ‘ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्ट’ मध्ये सहभागी होण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले. झाकीर हुसेन यांनी काही सिनेमांमध्ये काम केले आहे. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हीट अँड डस्ट’ या ब्रिटिश चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले. शशी कपूर यांनीही या चित्रपटात काम केले होते. त्यांनी १९९८ साली आलेल्या ‘साज’ चित्रपटातही काम केले होते. या चित्रपटात झाकीर हुसैन यांनी शबाना आझमी यांच्या प्रियकराची भूमिका साकारली होती.
‘मुघल-ए-आझम’ (१९६०) या चित्रपटात झाकीर हुसेन यांना सलीमच्या धाकट्या भावाच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, परंतु त्यावेळी त्यांच्या वडिलांनी ते मंजूर केले नाही. आपल्या मुलाने फक्त संगीतावर लक्ष केंद्रित करावे, अशी त्यांची इच्छा होती.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 648
झाकीर हुसेन निधन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

फडणवीसांना थेट ललकारलं! ३ महिने जेलमध्ये टाकलं तरी पुन्हा येईन; ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात एल्गार, दादरमध्ये उद्या ठिय्या

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर न्यायालयाचा मोठा निकाल! वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसवणाऱ्या चालकाला दिली ‘ही’ शिक्षा

By Annant Ppangarkar07/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महामार्गावरून पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत निष्काळजीपणे कंटेनर घुसवून चार जणांना चिरडून…

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026

बुधवार, ०७ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

07/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.