Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये वन खात्याच्या जंगलात तरुणाचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा संशय
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये वन खात्याच्या जंगलात तरुणाचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा संशय

परिसरात खळबळ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, २२ डिसेंबर 

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी परिसरात वन विभागाच्या आखत्यारीत येणाऱ्या जंगलामध्ये शनिवारी रात्री शरीराचे लचके तोडलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या तरुणाचा घातपात झाला की बिबट्याच्या हल्ल्यात याचा मृत्यू झाला याची माहिती अद्याप समोर आली नाही मात्र बिबट्याच्या हल्ल्यामध्ये या तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

रामनाथ सूर्यभान गुरकुले (वय ३४, रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) असे या तरुणाचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी घुलेवाडी (संगमनेर) येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेह लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी, रामनाथ गुरुकुले हा तरुण त्याच्याकडील दुचाकी शनिवारी रात्री चंदनापुरी शिवारातील ढगाडीबाबा जवळील उंबर विहारकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभी करून जवळच्या वनखात्याच्या जंगलात एका झाडाखाली तो झोपला होता. झोपलेल्या अवस्थेत त्याला काही ग्रामस्थांनी रात्री पाहिले असल्याची माहिती समोर येत आहे.

दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी विनोद राहणे या तरुणाला त्याचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. त्याने याची माहिती तातडीने चंदनापुरीचे सरपंच भाऊराव रहाणे यांना दिली. त्यानंतर राहणे यांनी संगमनेर तालुका पोलिसांना या संदर्भात कळविल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले. तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देखील याची माहिती देण्यात आल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे हेही घटनास्थळी आले होते.

घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मृत तरुणाचा मृतदेह ओढत नेल्याचे दिसून आले. तसेच मृत तरुणाचे मुंडके शरीरापासून वेगळे केल्याचे दिसत असल्याने त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

संगमनेर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून बिबट्याच्या हल्ल्यात या परिसरात झालेला हा चौथा मृत्यू असल्याचे बोलले जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 4,012
चंदनापुरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.