Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर नगर परिषदेची मोठी कारवाई… दोघा व्यापाऱ्यांकडून दीड टन प्लास्टिक जप्त, प्रत्येकी २५ हजाराचा दंड
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेर नगर परिषदेची मोठी कारवाई… दोघा व्यापाऱ्यांकडून दीड टन प्लास्टिक जप्त, प्रत्येकी २५ हजाराचा दंड

कोकरे यांनी पालिकेच्या कारभाराची सूत्रे हाती घेताच शहरात स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत कचऱ्याचे विलगीकरण तसेच सिंगल यूज प्लास्टिक पिशवी व इतर प्लास्टिकच्या संदर्भात लक्ष केंद्रित केले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, २५ डिसेंबर
संगमनेर नगर परिषदेने अखेर मोठी कारवाई केली आहे. शहरातील दोघा प्लास्टिक विक्रेत्यांवर छापे टाकत पालिकेच्या पथकाने दीड टन प्लास्टिक जप्त केले. यात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांसह प्लास्टिकच्या वस्तूंचा समावेश आहे. संगमनेर नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ यांची विधानसभा निवडणुकीपूर्वी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर मुख्याधिकारी म्हणून रामदास कोकरे यांनी पदभार घेतला होता. कोकरे यांनी पदभार घेतल्यानंतर पालिकेच्या पथकाला बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या जप्त करून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पालिकेच्या पथकाकडून सातत्याने शहरातील किरकोळ विक्रेत्यांकडून प्लास्टिक जप्तीची कारवाई केली जात होती.
एकीकडे किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई सुरू असताना दुसरीकडे मात्र या पिशव्यांचे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप होत होता. किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्याऐवजी शहरातील बड्या प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी देखील मागणी करण्यात आली होती. अखेरीस शहरातील प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई करण्यात पालिकेला यश आले आहे.
मंगळवारी दुपारी कोकरे यांचे नेतृत्वाखाली शहरातील पंजाबी कॉलनीत असलेल्या साईराज ट्रेडर्स या दुकानावर आणि परदेशपुरा भागात असलेल्या अरुण गवंडी यांच्या गोडाऊनवर राजेश गुंजाळ, प्रल्हाद देवरे, साजिद पटेल, प्रदीप मावळकर, अमजद पठाण, सतीश बुरुंगुले आदींच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली.
या कारवाईत पथकाने सिंगल वापरासाठीच्या प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक चमचे, ग्लास, डिश आदी वस्तूंचा सुमारे दीड टन साठा जप्त करण्यात आला. या दोन्ही व्यापाऱ्यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचा दंड देखील आकारण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.
कोकरे यांनी पालिकेच्या कारभाराची सूत्रे हाती घेताच शहरात स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत कचऱ्याचे विलगीकरण तसेच सिंगल यूज प्लास्टिक पिशवी व इतर प्लास्टिकच्या संदर्भात लक्ष केंद्रित केले आहे. प्लॅस्टिक वस्तूच्या वापरावर, साठा करण्यावर बंदी घातलेली असताना देखील काही व्यापाऱ्यांकडून सर्रासपणे या बंदी आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,560
दीपक साळुंके प्लास्टिक कारवाई रामदास कोकरे संगमनेर नगर परिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची…

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.