Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन… आज सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्थांना सुट्टी; ७ दिवसांचा दुखवटा जाहीर
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन… आज सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्थांना सुट्टी; ७ दिवसांचा दुखवटा जाहीर

मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ दरम्यान भारताचे पंतप्रधान होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, २७ डिसेंबर
नवी दिल्ली – भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री नवी दिल्लीमधील ‘एम्स’ रुग्णायामध्ये वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. मनोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी म्हणजेच २८ डिसेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती पीटीआय वृत्तसंस्थेनं अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले असून आज सकाळी ११ वाजता मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल.
सात दिवसांचा शासकीय दुखवटा… मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशातील वेगवेगळ्या राज्यांनी आज सुट्टी जाहीर केली आहे. तसेच आज (२७ डिसेंबर) रोजी कर्नाटक सरकारने सुट्टी जाहीर केली आहे.
कर्नाटकमधील बेळगावमध्ये काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक असल्याने रोषणाई करण्यात आली होती. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर ही रोषणाई उतरवण्यात आली आहे. २७ डिसेंबर रोजी महात्मा गांधींनी १९२४ साली राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपद स्वीकारल्याच्या घटनेला १०० वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त विशेष बैठक आयोजित करण्यात आलेली ती सुद्धा रद्द करण्यात आली आहे.
२६ डिसेंबर रोजी ते राहत्या घरात बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना गुरुवारी रात्री ८ वाजता रुग्णालयात आणण्यात आलं होतं. यानंतर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करताच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी तिथे पोहोचल्या होत्या. बेळगावमधील काँग्रेसची आजची नियोजित बैठक रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे बैठकीसाठी बेळगावमध्ये दाखल झाले होते. मात्र रात्रीच ते दिल्लीला परतले. त्यांनी रात्री उशीरा मनमोहन सिंग यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन पार्थिवाचं दर्शन घेत कुटुंबाचं सांत्वन केलं.
भारताच्या आर्थिक विकासात मोलाचा वाटा… मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ दरम्यान भारताचे पंतप्रधान होते. मागील काही काळापासून त्यांना वयोमानानुसार प्रकृती संदर्भातील समस्या जाणवत होत्या. १९९१ साली भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिकीकरण्याच्या शर्यतीत ठेवण्यासाठी घेण्यात आलेला मुक्त अर्थव्यवस्थेचा निर्णय हा मनमोहन सिंग अर्थमंत्री असतानाच घेण्यात आलेला. भारताच्या आर्थिक विकासामध्ये मोलाचा हातभार लावणाऱ्या मनमोहन सिंग यांनी २०१४ साली सक्रीय राजकारणामधून निवृत्ती घेतली. ते सध्या राज्यसभेचे खासदार होते.
डॉ. मनमोहन सिंग यांनी भूषवलेली पदे
देशाचे तेरावे पंतप्रधान – २२ मे २००४ ते २६ मे २०१४.
राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते – २१ मार्च १९९८ ते २१ मे २००४.
केंद्रीय अर्थमंत्री – २१ जून १९९१ ते १६ मे १९९६.
नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष – १५ सप्टेंबर १९८२ ते ३१ ऑगस्ट १९८७.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर – १५ सप्टेंबर १९८२ ते १५ जानेवारी १९८५.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 695
निधन मनमोहन सिंह
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.