Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तत्कालीन महसूल मंत्र्यांच्या निर्देशातूनच शिर्डी लोकसभा मतदारसंघात आश्वी, राजुर व घोडेगाव या ३ अप्पर तहसील कार्यालयाचे प्रस्ताव, विद्यमान महसूल मंत्री बावनकुळेंकडून योजनेला गती
राजकारण

तत्कालीन महसूल मंत्र्यांच्या निर्देशातूनच शिर्डी लोकसभा मतदारसंघात आश्वी, राजुर व घोडेगाव या ३ अप्पर तहसील कार्यालयाचे प्रस्ताव, विद्यमान महसूल मंत्री बावनकुळेंकडून योजनेला गती

त्या पार्श्वभूमीवर आता या तीन नवीन अपर तहसील कार्यालयाचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे प्रस्ताव राज्य शासनाला सादर केले जात आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 31, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर 

अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हा विभाजनाची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असताना काही दिवसांपूर्वी राज्यातील २१ जिल्ह्यांच्या विभाजनाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या पोस्ट नंतर पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्हा विभाजनाच्या चर्चेला उधाण आले होते. या चर्चांना पूर्णविराम देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. दरम्यान तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशातून जिल्हा विभाजना ऐवजी शिर्डी लोकसभा मतदारसंघात तीन नवीन अपर तहसील कार्यालय सुरू केली जाणार आहेत. या योजनेला विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गती दिली आहे.

संगमनेर, अकोले आणि नेवासे तालुक्याच्या तीनही तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला हे प्रस्ताव सादर केले असून ते पुढे कार्यवाहीसाठी गेल्याची माहिती समोर येत आहे. तहसीलदारांमार्फत पाठविण्यात आलेल्या या प्रस्तावात संगमनेर तालुक्यात आश्वी बुद्रुक, अकोले तालुक्यात राजुर आणि नेवासे तालुक्यात घोडेगावला ही तहसील कार्यालय प्रस्तावित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासकीय सोयीसाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा निर्मितीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. विशेष म्हणजे तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यकाळात या मागणीने जोर धरला होता. मात्र या दोन्ही नेत्यांनी जिल्हा विभाजन टाळले. नेत्यांमधील राजकीय वादातून हे विभाजन रखडल्याचा आरोप होत होता. जिल्हा मागणीसाठी संगमनेरचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ मोठे आंदोलन करण्यात आले होते. आता खता देखील विधानसभेत असल्याने हा प्रश्न ते कसे हाताळतात याकडे लक्ष लागले आहे.

त्यातच सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टने २६ जानेवारी रोजी नवीन जिल्ह्याची घोषणा होईल, या चर्चेने जोर धरला असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा विभाजनाचा प्रश्नच नाही असे सांगत या चर्चेची हवा काढून घेतली होती. त्या पाठोपाठ विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील सरकार समोर जिल्हा विभाजनाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगताना प्रशासकीय सोयीसाठी नवीन अपर कार्यालय सुरू केले जाऊ शकतात असे म्हटले होते.

त्या पार्श्वभूमीवर आता या तीन नवीन अपर तहसील कार्यालयाचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे प्रस्ताव राज्य शासनाला सादर केले जात आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,661
आश्वी अप्पर तहसील कार्यालय चंद्रशेखर बावनकुळे बाळासाहेब थोरात राधाकृष्ण विखे वाद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

By अनंत पांगारकरJuly 25, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: केंद्रातील हुकूमशाही आणि गर्विष्ठ सरकारला देशातील तरुणाईने पुरते नमवले आहे.…

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.