जनसेवा फाउंडेशनतर्फे हळदीकुंकू; डॉ. सुजय विखे व धनश्री विखे यांचा ग्लॅमरस रॅम्प वॉक ठरला आकर्षण
विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महिला सक्षमीकरण विषयक चर्चा तसेच पारंपरिक पोशाखातील रॅम्प वॉकने कार्यक्रमात रंगत आणली.
कोल्हार (ता. राहाता)
या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महिला सक्षमीकरण विषयक चर्चा तसेच पारंपरिक पोशाखातील रॅम्प वॉकने कार्यक्रमात रंगत आणली. डॉ. विखे पाटील दांपत्याने उपस्थित महिलांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देत महिलांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसेवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि महिला सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त झाले.



