Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सर्वांगीण विकासाचे आर्किटेक्ट – लोकनेते बाळासाहेब थोरात
महाराष्ट्र संवाद विशेष

सर्वांगीण विकासाचे आर्किटेक्ट – लोकनेते बाळासाहेब थोरात

लेखक नासिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार असून जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/02/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
महाराष्ट्र ही संत व विचारवंतांची भूमी आहे. देशाच्या राजकारणाला महाराष्ट्राने कायम दिशा दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा सांगणार्‍या या भूमीत स्व. यशवंतरावजी चव्हाण यांनी कृषी-औद्योगिक क्रांतीचा पाया घालून विकसित महाराष्ट्र निर्माण केला. याच विचारांचा वारसा घेऊन राज्यात कार्यरत असलेले काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात हे सर्वसामान्य जनतेचे खऱ्या अर्थाने आश्वासक व महाराष्ट्राचे राजहंस नेतृत्व ठरले असून सर्वांगीण विकासाचे आर्किटेक्ट आहे.
स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन १९८५ साली बाळासाहेब थोरात यांनी सर्वात कमी वयाचे लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाला सुरुवात केली. पाण्यासाठी आग्रह धरताना भंडारदर्‍याच्या पाण्यावर संगमनेर-अकोले तालुक्याला १९८९ मध्ये ३० टक्के हक्क मिळवून दिला. याच काळात गावोगावी दूध संस्थांची निर्मिती करून संगमनेर तालुका हा दुग्ध व्यवसायात अग्रेसर बनवला. तसेच गावोगावी पाणीपुरवठा योजनांचे जाळेही निर्माण केले. दुष्काळी भागाकरिता निळवंडे धरणाचा ध्यास घेतलेल्या थोरात यांना १९९९ मध्ये राज्य मंत्रिमंडळातील पहिली संधी मिळाल्यानंतर त्यांना अपेक्षित असलेले कॅबिनेट मंत्रीपद न मागता निळवंडे धरणाकरिता पाटबंधारे खात्याचे राज्यमंत्री पद घेतल.
अगदी पहिल्याच दिवशी निळवंडेच्या कामाची फाईल हाती घेऊन अनेक दिवस रेंगाळलेले निळवंडे खर्‍या अर्थाने १९९९ मध्ये कार्यान्वित केले. अनेक अडचणीवर मात करुन “आधी पुनर्वसन, मग धरण”, हा आदर्शवत प्रकल्प राबविला. अनेक अडचणींवर मात करुन निळवंडे धरणाचे काम २०१२ पर्यंत पूर्ण केले. याच काळात प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवताना कवठे कमळेश्वर, पिंपळगाव कोंझिरा, गणेश वाडी येथील मोठ-मोठे बोगदेही मार्गी लावताना कालव्यांची कामे सुरू ठेवली.
यासोबत संगमनेर शहरासाठी थेट पाईपलाईनची ऐतिहासिक योजना पुर्ण केली. संगमनेर शहरात हायटेक बस स्थानक, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, नगरपालिका, कवी अनंत फंदी नाट्यगृह, कोर्ट, पंचायत समिती यांसह अनेक वैभशाली इमारती उभारल्या.
समृद्ध सहकाराबरोबर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी गावोगावी रस्ते, इमारती, जलसिंचन योजना, सिमेंट बंधारे, दवाखाने, शाळा, विविध सभामंडप असे अनेक विकास कामे सातत्याने राबवली. सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत अविश्रांत काम करताना लोकनेते थोरात यांनी संगमनेर तालुक्यातून सलग आठ वेळेस विक्रमी मताधिक्याने विजयी होण्याचा मान मिळवला.
संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये प्रत्येक कामाला गती देत त्यांनी पारदर्शकपणे काम केले. शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी, कामगार यांच्यासाठी सातत्याने विविध योजना प्रभावीपणे राबविल्या. मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण, रोजगार हमी, पाटबंधारे अशी महत्वाची खाते भूषवताना या खात्यांना लोकाभिमुख व पारदर्शक बनवले. त्यांच्या कामाचा आवाका मोठा असल्याने पक्षाला मोठा जनाधार मिळवून दिला. काँग्रेस पक्षाची प्रामाणिकता व एकनिष्ठता यासंह सर्व कामांची दखल घेत केंद्रीय नेतृत्वाने कायम त्यांच्यावर जबाबदारी दिल्या. त्यांनीही जबाबदारी सक्षमपणे पार पाडली.
याचबरोबर गुजरातचे हिमाचल प्रदेश निरीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून श्रीमती सोनिया गांधी यांनी मार्च २०१८ मध्ये काँग्रेसच्या अतिमहत्वाच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीवर कायमस्वरूपी सदस्य म्हणून निवड केली आणि त्यांचे नेतृत्व अधोरेखित झाले.
पुढे पक्षाला उभारी देण्याबरोबर विविध निवडणुकांमध्ये त्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण राहिला २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची पीछेहाट झाली. अशातच अनेक जण पक्षांतर करू लागले. आणि या अडचणीच्या काळात काँग्रेस अध्यक्षांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. स्वातंत्र्यसैनिकांचे चिरंजीव असलेले बाळासाहेब थोरात यांनी ही जबाबदारी स्वीकारली. अडचणीत असताना पळायचे नसते तर लढायचे असते हे सांगून सर्व काँग्रेसजनांना प्रोत्साहित केले.
पक्षाला पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर काढले आणि विधानसभेमध्ये काँग्रेसचे दमदार आगमन झाले. काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचे महाविकास आघाडी होवून राज्यात नवीन सरकार स्थापन झाले. मंत्रिमंडळात महत्त्वाचे महसूलमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना पक्षप्रमुख आणि महत्त्वाचे मंत्री अशी दोन्ही जबाबदारी त्यांनी सक्षमपणे पार पाडली .
२०२० मध्ये कोरोना संकटाने जगासह भारत देश ठप्प झाला. लॉकडाऊनमुळे अनेकांचे स्थलांतर होवू लागले. अशा अडचणीच्या काळात कोरोनाचा सामना करतांना दररोज १८ तास काम करुन थोरात यांनी शर्थीने महसूल विभाग व प्रशासनाचे नेतृत्व केले. कोरोना पाठोपाठ चक्रीवादळ, अतिवृष्टी यामध्ये शेतकरी व नागरिकांना दिलासा दिला. यामुळे राज्यातील शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब त्यांच्याकडे आशेने पाहतो आहे. सहकार, शिक्षण, कृषी, ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रामध्ये थोरात यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी व ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी यांचे जीवन समृद्ध होण्यासाठी लोकनेते थोरात यांचे नेतृत्व सर्वांसाठी आश्वासक ठरत आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 989
बाळासाहेब थोरात वाढदिवस विशेष सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.