काँग्रेसच्या माजी आमदाराला अटक… नेमकं कारण काय?
२००६ ते २०२३ या दरम्यान अजिंठा अर्बन बँकेत ९७ कोटी ४१ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर याप्रकरणी माजी आमदार सुभाष झांबड यांच्यावर छत्रपती संभाजी नगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.


शुक्रवार, दि. ०७ फेब्रुवारी –
२१ जानेवारीला न्यायालयाने झांबड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते पोलिसांना शरण आले. जामीन मिळण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर त्यांनी अखेरीस पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर पोलिसांनी आज त्यांना अटक केली आहे.
२००६ ते २०२३ या दरम्यान अजिंठा अर्बन बँकेत ९७ कोटी ४१ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर याप्रकरणी माजी आमदार सुभाष झांबड यांच्यावर छत्रपती संभाजी नगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील पहिला गुन्हा ऑक्टोंबर २०२३ तर दुसरा गुन्हा नोव्हेंबर २०२४ मध्ये नोंदविण्यात आला होता.
ऑक्टोंबर मध्ये पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून झांबड अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत होते. त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठात केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर अटकेच्या भीतीने ते फरार झाले होते.
फरार असलेले माजी आमदार झांबड शहरातील काही सोहळ्यांमध्ये दिसून आले असले तरी आर्थिक गुन्हे शाखेला मात्र ते सापडत नव्हते. दरम्यान माजी आमदार झांबड यांनी अटकपूर्व जामीन साठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला विशेष अर्ज मागे घेतला होता. झांबड यांच्यावतीने ज्येष्ठविधीज्ञ मुकुल रोहतगी आणि सुधांश जोशी यांनी सत्र न्यायालयात जामीन अर्ज करायचा असल्याने हा अर्ज मागे घेण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती केली होती. 
त्यानंतर सुनावणी वेळी न्यायमूर्ती पी. एस. नरसिंम्हा आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांनी अर्ज मागे घेण्यास परवानगी दिली होती.
दरम्यान झांबड यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.

