Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूध डेअरीच्या १७ लाखाच्या लूटप्रकरणातील चौथा आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला दोन महिन्यानंतर यश
गुन्हेगारी

दूध डेअरीच्या १७ लाखाच्या लूटप्रकरणातील चौथा आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला दोन महिन्यानंतर यश

पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार संदीप पवार, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, आकाश काळे, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड व उमाकांत गावडे यांच्या पथकाने केली कामगिरी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, दि. ०९ फेब्रुवारी 

दूध डेअरीची १७ लाखाची रोकड बँकेत भरणा करण्यासाठी घेऊन जात असताना फिर्यादीला लुटणाऱ्या टोळीतील चौथा आरोपी तब्बल २ महिन्यानंतर जेरबंद करण्यात अहिल्या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

ऋषीकेश उर्फ पप्पु अनिल कुसळकर (वय २१, रा. राजलक्ष्मी निवास, बाळकृष्ण नगर, पेठ रोड, पंचवटी नाशिक) असे पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. पकडलेल्या आरोपीला राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास राहुरी पोलीस करत असल्याची माहिती देण्यात आली.

फिर्यादी अनिल मुरलीधर बनसोडे (वय ५१, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी) हे दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी मुळा अँग्रो प्रोडक्ट लि. ब्राम्हणी, ता. राहुरी या कंपनीची १७ लाख रुपयांची रोख रक्कम बँकेमध्ये भरणा करण्यासाठी कारमधुन जात असताना अज्ञात चार आरोपीनी त्यांच्या कारला काळ्या रंगाची किया कार आडवी लावली.

कार मधील दोन आरोपीनी गज व टॉमीने फिर्यादी बनसोडे यांच्या ताब्यात असलेल्या फोर्ड कारच्या काचा फोडून, साक्षीदार यांना टॉमीने मारहाण करून त्यांचेजवळील रोख रक्कम असलेली बॅग जबरदस्तीने नेत पलायन केले होते.

याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३१३/२०२४ बीएनएस कलम ३०९ (६) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने सचिन राजेंद्र वायदंडे, शुभम मनोज गुळसकर व अभिषेक लक्ष्मण जाधव अशा तिघा संशयित आरोपीना मुद्देमालासह पकडत राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. तर अन्य आरोपी गुन्हा केल्यापासुन फरार झालेले होते.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार संदीप पवार, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, आकाश काळे, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड व उमाकांत गावडे यांनी तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपी ऋषीकेश उर्फ पप्पु कुसळकर, रा. नाशिक हा पुणे येथे असल्याची माहिती मिळविली. त्यानंतर या पथकाने पुणे येथे जात आरोपीला पकडले.

आरोपी कुसळकर याच्याकडे गुन्हयाबाबत पथकाने विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार अमोल शिंदे (रा. नागापूर, एमआयडीसी, अहिल्यानगर), मोहन सुरेश लष्करे (रा. नेवासा, ता. नेवासा), प्रतिक जाधव (रा. ब्राम्हणी, ता. राहुरी), सचिन वायदंडे (रा. नागापूर, एमआयडीसी, अहिल्यानगर), शुभम गुळसकर (रा. बोल्हेगाव, एमआयडीसी, अहिल्यानगर) व अभिषेक जाधव, (रा. एमआयडीसी, नवनागापूर, अहिल्यानगर) अशांनी मिळून प्लॅन करून केला असल्याची कबुली दिली. तसेच आरोपींनी गुन्हयांत वापरलेली किया कार ही कृष्णा पुनमसिंग परदेशी (रा. नेवासा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) याची असल्याचे सांगीतले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,323
राहुरी लूट स्थानिक गुन्हे शाखा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.