Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पिस्तूलचा धाक दाखवत संगमनेर तालुक्यात नाशिक-पुणे महामार्गावर लूटमार, ट्रक चालकाला बेशुद्ध करत शेती औषधांचे ६ लाख रुपयांचे बॉक्स पळवले
गुन्हेगारी

पिस्तूलचा धाक दाखवत संगमनेर तालुक्यात नाशिक-पुणे महामार्गावर लूटमार, ट्रक चालकाला बेशुद्ध करत शेती औषधांचे ६ लाख रुपयांचे बॉक्स पळवले

गाडीत बसलेल्या दुसऱ्याने चालकाच्या कमरेला पिस्तूल लावले व खाली उतरलेल्या इसमाने दरवाजाच्या बाजूने येऊन पांढऱ्या रंगाचा रुमाल नाकाला लावल्यानंतर चालक बेशुद्ध पडला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, दि. १० फेब्रुवारी – प्रतिनिधी

या-ना त्या कारणाने सातत्याने चर्चेत असलेल्या घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नासिक-पुणे मार्गावर लुटमारीचा नवा प्रकार समोर आला आहे. ट्रक चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवत शेतीसाठी असलेल्या औषधांचे ५ लाख १२ हजार २१४ रुपयांचे १८१ बॉक्स आणि बॅग ट्रकमधून अज्ञात दोघे अनोळखी व्यक्तींनी पळविले आहेत.

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील माहुली घाटामध्ये गेल्या आठवड्यात ही घटना घडली असून ट्रक चालकाच्या तोंडाला रुमाल लावून त्याला बेशुद्ध करून पिस्तूलचा वापर करीत लुटमार केल्याची घटना घडली. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीलगत पुणे जिल्ह्याचे सीमा असल्याने अहिल्यानगर पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे या परिसरात मोठी वर्दळ असते. गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे या प्रकरणामुळे उघड होत आहे.

याबाबतची माहिती अशी की, सिद्धिविनायक लॉजिस्टिक कंपनीचा शेती औषधांचा माल घेऊन फुरसुंगी, पुणे येथून लेलँड कंपनीचा ट्रक (एमएच ४२ ए क्यू ८०७८) हा नाशिककडे चालला होता. चाळकवाडीच्या पुढे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात तरुण इसम हात दाखवून ट्रकमध्ये बसले. या दोन अज्ञात इसमांचे नाव पत्ता सदर ट्रक चालकाला माहित नाही.

त्या दोघांनी संगमनेरला जायचे आहे असे सांगितले होते. त्यानंतर हे सर्व त्या ट्रकमधून संगमनेरकडे निघाले असता पहाटे चार वाजण्याच्या सुमारास माहुली घाटामध्ये त्यातील एकाने बाथरूमला जायचे असल्याचे सांगून गाडी थांबवली व तो खाली उतरला. त्यानंतर गाडीत बसलेल्या दुसऱ्याने चालकाच्या कमरेला पिस्तूल लावले व खाली उतरलेल्या इसमाने दरवाजाच्या बाजूने येऊन पांढऱ्या रंगाचा रुमाल नाकाला लावल्यानंतर चालक बेशुद्ध पडला.

तो त्यांनी त्याला ट्रकच्या हौदामध्ये सोडून दिले. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सदर ट्रक चालक शुद्धीवर आल्यानंतर त्या ट्रकमधील शेतीमालाचे औषध बॅग्स, बॉक्स गायब झालेले त्यास आढळून आले. या ट्रकमध्ये सिद्धिविनायक लॉजिस्टिक कंपनीचे शेतीमालाचे औषधाचे ५ लाख ७२ हजार २१४ रुपयांचे १८१ बॉक्स होते.

या संदर्भात ट्रकचालक दीपक किसन कदम (वय ४२ वर्ष, रा. राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,624
गुन्हेगारी घारगाव पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.