Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माती प्रकरणात १ लाखाची लाच घेणाऱ्या वनविभागाच्या दोघांवर तर ३५ हजाराची मागणी करणाऱ्या एकावर लाचलुचपतची कारवाई, वन विभागाचे तिघे एसीबीच्या जाळ्यात; वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल आणि वनरक्षकाचा समावेश
गुन्हेगारी

माती प्रकरणात १ लाखाची लाच घेणाऱ्या वनविभागाच्या दोघांवर तर ३५ हजाराची मागणी करणाऱ्या एकावर लाचलुचपतची कारवाई, वन विभागाचे तिघे एसीबीच्या जाळ्यात; वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल आणि वनरक्षकाचा समावेश

वनविभागाच्या तिघांविरोधात गडचिरोलीच्या अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीनही लोकसेवक आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, दि. १० फेब्रुवारी –

घरकुलाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या विटा बनविण्याकरिता गावानजीकच्या नाल्यातून माती उत्खनन करणाऱ्या तक्रारदाराच्या नातेवाईकाचा ट्रॅक्टर, मजूर आणि तक्रारदारावर वनविभागाच्या वनपालाने गुन्हा दाखल करण्याचा धाक दाखवत मातीसाठी वापरण्यात येणारा ट्रॅक्टर घेऊन गेला. प्रकरण मिटविण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे एक लाख दहा हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी तसेच लाचलुचपतच्या कारवाई दरम्यान प्रकरण मिटविण्यासाठी दुसऱ्या वनरक्षकाने ३५ हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी तिघांवर लाच लुचपत विभागाने कारवाई केली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी ममता नामदेव राठोड, वनपाल मारुती संभाजी गायकवाड आणि वनरक्षक गणेश उत्तम राठोड अशी कारवाई करण्यात आलेल्या तिघा लोकसेवक आरोपींची नावे आहे. एकाच वेळी लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्गम भागात गडचिरोलीमध्ये या दोन कारवाया केल्या.

नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली लाच लुचपतचे पोलीस उपाधीक्षक चंद्रशेखर ढोले, पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड, संतोष पाटील, सहाय्यक फौजदार सुनील पेद्दीवार, हवालदार शंकर डांगे, किशोर जंजाळकर, हितेश पद्मगीरवार, स्वप्निल वांबोळे, पोलिस अंमलदार संदीप घोरपडे, संदीप उडान, प्रवीण जुमनाके आदींनी ही कारवाई केली.

राज्य शासनाकडून तक्रारदाराला घरकुल मंजूर झाले आहे. या घरकुलाच्या बांधकामासाठी विटा बनवण्याकरता आवश्यक असलेली माती तक्रारदाराने गावानजीकच्या नाल्यातून आपल्या नातेवाईकांच्या मदतीने ट्रॅक्टरमध्ये भरत असताना तेथे आलेल्या वनपाल मारुती गायकवाड यांनी तक्रारदार वनविभागाच्या जागेतून अवैधपणे माती उत्खनन करत असल्याचे सांगून कारवाई करण्याची भीती दाखविली. तसेच कारवाई न करण्यासाठी एक लाख दहा हजार रुपयांची लाच मागितली.

त्यामुळे तक्रारदाराने गडचिरोलीच्या लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती. लाच लुचपतचे अधिकारी या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी जात असताना वनरक्षक गणेश उत्तम राठोड याने तक्रारदाराला भेटून सौम्य दंडात्मक कारवाई करून प्रकरण मिटविण्यासाठी ३५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने गायकवाड यांची भेट घेतली असता राठोड याने वनपरिक्षेत्र अधिकारी ममता राठोड यांच्या समक्ष लाचेची मागणी केली. तक्रारदाराने एवढी मोठी रक्कम देण्यास असमर्थता दर्शविल्याने ममता राठोड घेणे तक्रारदारास गुन्हा नोंद करून तुरुंगवासाची कारवाई होईल अशी भीती घालून लाच देण्यास प्रोत्साहित केले.

ममता राठोड यांच्या दालनातून बाहेर आल्यावर वनपाल गायकवाड यांनी तक्रारदाराकडे तडजोडीअंती १ लाखाची मागणी केली. त्यानंतर त्यानंतर ममता राठोड यांच्या दालनात गायकवाड यांनी तक्रारदाराकडून एक लाख रुपये स्वीकारले. पैसे घेतल्यानंतर तक्रारदाराला सतरा हजार रुपयांची दंडात्मक पावती देण्यात आली तर उर्वरित रक्कम लाच म्हणून स्वीकारण्यात आल्याने लाच लुचपत विभागाने तिघांवर कारवाई केली आहे.

वनविभागाच्या तिघांविरोधात गडचिरोलीच्या अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीनही लोकसेवक आरोपींना अटक करण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 909
लाच लुचपत लाचखोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.