Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पत्नीच्या आत्महत्या प्रकरणी नामांकित डॉक्टरसह सासू-सासऱ्याविरोधात गुन्हा
गुन्हेगारी

पत्नीच्या आत्महत्या प्रकरणी नामांकित डॉक्टरसह सासू-सासऱ्याविरोधात गुन्हा

पोलीस कर्मचारी अरविंद चव्हाण पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी गेले असता त्यांना ही घटना संशयास्पद वाटली. त्यामुळे त्यांनी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात मृत महिलेचे शवविच्छेदन न करता मृतदेह अहिल्यानगर येथे वैद्यकीय तपासणीसाठी पाठविला होता.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार दि. १० फेब्रुवारी –
वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या नामांकित डॉक्टरच्या पत्नीने राहत्या घरात आतून दरवाजा लावून घेत छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये घडला होता.

आता या प्रकरणी पोलिसांनी डॉ. सुशील कबाडी यांच्या विरोधात पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. यामुळे वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
सायली सुशील कबाडी (वय ३३, रा. सिद्धिविनायक कॉलनी, शेवगाव) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर पत्नीचे नाव आहे. यासंदर्भात सायली कबाडी यांचे वडील चंद्रकांत हरिश्चंद्र परब यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून डॉ. सुशील जगन्नाथ कबाडी, सासरा व सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकांत परब यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सायली व डॉ. सुशील यांचा विवाह १४ डिसेंबर २०१६ रोजी झाला होता. सुरुवातीचे दोन वर्ष सायली हिला चांगले नांदविल्यानंतर तुला जेवण करता येत नाही, तुझ्या वडिलांनी हुंडा दिला नाही, माहेराहून दहा लाख रुपये घेऊन ये अशी वारंवार मागणी करत सायली हिचा सासरच्या मंडळी कडून तिचा छळ केला जात होता.
तिला मारहाण, शिवीगाळ, दमदाटी याबरोबरच शारीरिक, मानसिक छळ करत क्रूर वागणूक दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पंचनामा करणाऱ्या पोलीस अंमलदाराला संशय…
दरम्यान सायली यांनी आत्महत्या केल्याचे समजताच डॉ. सुशील याने घरातील सदस्यांच्या मदतीने दरवाजा तोडला होता. त्यानंतर सायलीने राहत्या घराच्या खोलीचे दार आतून लावून छताच्या हुकाला साडीच्या साह्याने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना दिली होती. माहिती मिळताच पोलीस कर्मचारी अरविंद चव्हाण पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी गेले असता त्यांना ही घटना संशयास्पद वाटली. त्यामुळे त्यांनी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात मृत महिलेचे शवविच्छेदन न करता मृतदेह अहिल्यानगर येथे वैद्यकीय तपासणीसाठी पाठविला होता. शवविच्छेदन अहवालामध्ये मृत महिलेच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी कबाडी यांच्याविरुद्ध पत्नी सायली हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,194
शेवगाव पोलीस सायली कबाडी सुशील कबाडी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.