Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लहान मुलांबरोबर माजी खासदार डॉ. विखे व आमदार खताळ यांनी धरला गाण्यावर ठेका! गौरी दगडू ठरल्या एक तोळा सोन्याच्या हाराच्या मानकरी
राजकारण

लहान मुलांबरोबर माजी खासदार डॉ. विखे व आमदार खताळ यांनी धरला गाण्यावर ठेका! गौरी दगडू ठरल्या एक तोळा सोन्याच्या हाराच्या मानकरी

स्पर्धांमधून विजेत्या ठरलेल्या महिलांना पैठणी देऊन सन्मान करण्यात आला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/02/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर दि. १० फेब्रुवारी –

जनसेवा फाउंडेशनच्यावतीने मकर संक्रांतीनिमित्त संगमनेर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा-सन्मान महिलांचा’ या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ‘झालय झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट’ आणि ‘मै हु डॉन’ या गाण्याच्या तालावर लहान बालगोपाळांमध्ये सहभागी होऊन माजी खा. डॉ. सुजय विखे व आ. अमोल खताळ यांनी ठेका धरत नृत्य सादर केले. त्यांच्या साथीला उपस्थित असलेल्या महिलांनी सुद्धा या गाण्याच्या तालावर ठेका धरत नृत्य सादर करत एकच जल्लोष साजरा केला.

राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे माजी खा. डॉ. सुजय विखे आणि रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्ष धनश्री विखे, संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकारातून शहरातील जाणता राजा मैदानावरती खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व महिलांना संक्रातीचे वाण म्हणून जेवणाचा डबा भेट देण्यात आला. माजी खासदार डॉ. सुजय विखे त्यांच्या पत्नी रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्ष धनश्री विखे व आमदार अमोल खताळ त्यांच्या पत्नी निलम खताळ यांनी या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांचे स्वागत केले.

यावेळी निवेदक संदीप पाटील यांनी उपस्थित असलेल्या महिलांचे रस्सीखेच, संगीत खुर्ची, लंगडी घालून बॉल पकडणे, विविध गाण्यांवरती नृत्य सादर करणे व कॉमेडी करणे यासारख्या अनेक स्पर्धा घेतल्या. स्पर्धांमधून विजेत्या ठरलेल्या महिलांना पैठणी देऊन सन्मान करण्यात आला.

तर जमा झालेल्या कुपनामधून लकी ड्रॉ काढण्यात आला. या लकी ड्रॉ सोडतीत संगमनेर शहरातील गौरी नितीन दगडू ही महिला एक तोळे वजनाच्या सोन्याच्या हाराची मानकरी ठरली तर विभावरी संतोष वाकचौरे आणि शीतल संतोष देशमुख या दोन महिलांना ४० इंची सोनी कंपनीची एलईडी टीव्हीच्या द्वितीय क्रमांकाच्या, शितल संतोष शेवंते आणि कल्याणी आप्पासाहेब दरेकर या दोन महिला सॅमसंग कंपनीचे डबलडोअर फ्रिजच्या तृतीय क्रमांकाच्या, तर डॉ. वर्षा अजिंक्य उपासनी आणि वनिता किरण लहारे या दोन महिला ऑटोमॅटिक वॉशिंग मशिनच्या चतुर्थ क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. तसेच एअर कुलर, वॉटर प्युरी फायर, प्रेस्टीज मिक्सर, वंडरशेफ ओव्हन, प्रेस्टीज व्हॅक्यम क्लिनर, प्रेस्टीज इंडक्शन आदी वस्तू बक्षीस देऊन गौरव करण्यात आला 

मुझको पहेचान लो मैं हूँ डॉन’ या गाण्यावर भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी ठेका धरत डान्स केला. या गाण्यावर नृत्य सादर करत माजी खासदार डॉ. विखे यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना खिजवण्याचा प्रयत्नच केल्याची चर्चा संपूर्ण शहरात होत आहे.

हे जाणता राजा मैदान कधीच भरत नाही

असे काहीजण म्हटले होते. परंतु संगमनेरच्या या लाडक्या बहिणींनी हे जाणता राजा मैदान भरून दाखवलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. असा खोचक टोला विधानसभा निवडणुकीच्या वेळी जाणता राजा मैदान बुक करणाऱ्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता भाजपचे माजी खासदार डॉ सुजय विखे यांनी लगावला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,641
अमोल खताळ सुजय विखे हळदी कुंकू
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.