Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा संगमनेर बस स्थानकासमोरच, पुढील वर्षाची जयंती अश्वारूढ पुतळ्यासमोरच – आमदार सत्यजित तांबे
धार्मिक

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा संगमनेर बस स्थानकासमोरच, पुढील वर्षाची जयंती अश्वारूढ पुतळ्यासमोरच – आमदार सत्यजित तांबे

मागील अनेक वर्षांपासून संगमनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ सकल मराठा समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी केली जाते. यावर्षी देखील नियमित शिवजयंती करणाऱ्या सकल मराठा समाजाचा कार्यकर्त्यांना जाणून बुजून या उत्सवापासून दूर ठेवू नये व महाराजांच्या जयंती उत्सवात सुद्धा राजकारण करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. १९ फेब्रुवारी –

लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली वैभवशाली ठरलेल्या संगमनेर संगमनेर शहरात येणाऱ्या वर्षाच्या आतच प्रत्येकाची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बस स्थानकासमोर उभा करून पुढील वर्षीची जयंती येथे साजरी करू असा विश्वास नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला.

बुधवारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर तांबे बोलत होते. यावेळी सोमेश्वर दिवटे, किशोर पवार, सतीश आहेर, अंबादास आडेप आदीसह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

तांबे म्हणाले, लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये बस स्थानकासमोर भव्य अश्वारूढ पुतळा वर्षभराच्या आतच उभा राहणार आहे. या पुतळ्यासाठी नगरपरिषदेने ३ जून २०१९ रोजी झालेल्या वार्षिक सभेत ठराव करत शासनाकडे जागा मागितली होती. यासाठी पाठपुरावा करत आपण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अश्वारूढ पुतळ्यासाठी संगमनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारा जवळील जागा २१ ऑगस्ट २०२३ रोजी हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. या मागणीला तात्काळ मंजुरी मिळाली.

त्यामुळे पुतळ्यासाठी बस स्थानकासमोर जागा निश्चित करण्यात आले असून एक कोटी रुपयांचे निधीतून येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा तयार केला जाणार असून पुतळ्याचा परिसर देखील सुशोभित करण्यात येणार आहे. या कामासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर करून घेऊ किंवा नगरपालिकेच्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी उभा करून या ठिकाणी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला जाईल.

याशिवाय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील पूर्णाकृती पुतळा उभा केला जाणार असून, स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ भव्य शहीद स्मारक उभे केले जाणार आहे. याचबरोबर तसं सांगता समोर दर्शनी जागेवर भव्य शंभर फुटी तिरंगा उभा केला जाणार असल्याचे तांबे यांनी म्हटले आहे.

छावा चित्रपट करमुक्त करा… हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाचा आणि शौर्याचा ज्वलंत इतिहास सांगणारा छावा हा चित्रपट राज्य सरकारने करमुक्त करावा अशी मागणी सरकारकडे केले असल्याचे स्पष्ट करा त्याबाबत सकारात्मक निर्णय होऊन लवकरच हा चित्रपट करमुक्त होईल अशी अपेक्षा तांबे यांनी व्यक्त केली.

जयंती उत्सवात राजकारण दुर्दैवी… मागील अनेक वर्षांपासून संगमनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ सकल मराठा समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी केली जाते. यावर्षी देखील नियमित शिवजयंती करणाऱ्या सकल मराठा समाजाचा कार्यकर्त्यांना जाणून बुजून या उत्सवापासून दूर ठेवू नये व महाराजांच्या जयंती उत्सवात सुद्धा राजकारण करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे असे देखील तांबे म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,048
छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा शिवजयंती उत्सव सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar06/09/20260

आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त…

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.