
शनिवार, दि. १ मार्च
काँग्रेसने विधान परिषदेच्या गटनेतेपदी सतेज पाटील यांची तर विधानसभा मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख यांची निवड केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी (१ मार्च) काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या सोशल मीडिया ‘X’ अकाउंटवरून याची माहिती दिली आहे. सपकाळ यांनी म्हटले आहे की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर केल्या आहे.

यामध्ये विधानसभा उपनेते म्हणून अमीन पटेल, विधानसभा मुख्य प्रतोद अमित देशमुख, विधानसभा सचिव विश्वजीत कदम, विधानसभा प्रतोद शिरीषकुमार नाईक व संजय मेश्राम, विधानपरिषद गटनेता सतेज उर्फ बंटी पाटील, विधान परिषद मुख्य प्रतोद अभिजीत वंजारी, विधान परिषद प्रतोद राजेश राठोड या नेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
सपकाळ यांनी नवनियुक्त सर्व नेत्यांचे आभार मानत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
https://x.com/harshsapkal/status/1895729632160133314?t=BqWb6mfdQypS2FGz3J8Mgg&s=19




