Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अपर तहसील कार्यालय आश्विलाच होणार, पालकमंत्री विखे यांची स्पष्टोक्ती… ज्या गावांना समाविष्ट व्हायचे नसेल त्यांना वगळणार, महसूल विभागाने मागविल्या हरकती
राजकारण

अपर तहसील कार्यालय आश्विलाच होणार, पालकमंत्री विखे यांची स्पष्टोक्ती… ज्या गावांना समाविष्ट व्हायचे नसेल त्यांना वगळणार, महसूल विभागाने मागविल्या हरकती

आश्वी अपर तहसिल कार्यालयाच्‍यासंदर्भात आता महसूल विभागाने हरकती मागविल्‍या आहेत. महसूल मंडळांची रचना झाल्‍यानंतर अप्‍पर तहसिल कार्यालयाची निर्मिती होईल. ज्‍या गावांना समाविष्‍ठ व्‍हायचे नसेल त्‍यांना वगळून हे कार्यालय होणारच असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, दि. ८ – प्रतिनिधी

आम्‍ही माणसं जोडण्‍यासाठी आश्‍वी आणि परिसरात पाच पुल बांधून दाखविले आहेत. तोडण्‍याची भाषा आम्ही कधीही केली नाही, अपर तहसिल कार्यालय हे जनतेच्‍या सुविधेसाठी आहे. तुमच्‍या ‘यशोधनातून’ जनतेला मुक्‍तता हवी होती. विधानसभेला तालुक्‍यातील जनतेने परिवर्तन केले आहे. जनतेला मिळालेले स्‍वातंत्र्य आता तुम्‍ही हिरावून घेवू नका, असा खरमरीत टोला मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी थोरातांचे नाव न घेता लगावला.

आश्‍वी बुद्रूक येथे प्रवरा मेडिकल ट्रस्‍टच्‍या आरोग्‍य केंद्राच्‍या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी विधानसभा निवडणूकीनंतर प्रथमच थोरातांचे नाव न घेता त्‍यांच्‍यावर टिकास्‍त्र सोडले.

निमित्‍त होते अप्‍पर तहसिल कार्यालयाचे. हे कार्यालय आश्‍वी आणि पंचक्रोशीतील गावे तसेच अन्‍य शेजारील गावे यांच्‍या सुविधेसाठी तयार होणार होते परंतू काहींना पोटसुळ उठला, त्‍यांनी लगेच तालुका तोडण्‍याची भाषा सुरु केली, त्‍यांना स्‍वातंत्र्याची लढाई आठवली.

आश्‍वीच्‍या लोकांना अपर तहसिल कार्यालय हवे आहे, या भागातील त्‍यांच्‍या समर्थकांनाही विचारा तुम्‍हाला कार्यालय हवे आहे की, नको. यापुर्वी सुध्‍दा पोलिस स्‍टेशनमध्‍ये समाविष्‍ठ असलेली गावे त्‍यांनी जाणीवपुर्वक काढून घेतली होती. उच्‍च न्‍यायालयात लढाई करुन, ही गावे पुन्‍हा आश्‍वीमध्‍ये समाविष्‍ठ केली.

आश्वी अपर तहसिल कार्यालयाच्‍यासंदर्भात आता महसूल विभागाने हरकती मागविल्‍या आहेत. महसूल मंडळांची रचना झाल्‍यानंतर अप्‍पर तहसिल कार्यालयाची निर्मिती होईल. ज्‍या गावांना समाविष्‍ठ व्‍हायचे नसेल त्‍यांना वगळून हे कार्यालय होणारच असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

विधानसभा निवडणूकीत तालुक्‍यातील जनतेने परिवर्तन घ‍डविले आहे. तुमच्‍या ‘यशोधन’मधूनच तालुक्‍यातील जनतेला मुक्‍तता हवी होती. जनतेने केलेल्‍या परिवर्तनातूनच अमोल खताळांसारखा एक सामान्‍य तरुण लोकांनी आमदार म्‍हणून निवडून दिला. आम्‍ही जोडण्‍याचे काम करतो, तोडण्‍याचे नाही.

अपर तहसिल कार्यालयाची चर्चा सुरु झाली तर यांना स्‍वातंत्र्याची लढाई आठवली. आता जरा शांत बसा, जनतेने तुमच्‍या बाबतीत निर्णय केला आहे. त्‍यांना त्‍यांचे काम करु द्या. तुमच्‍या कारकीर्दीत वाळु आणि क्रशर माफियांना वैभव प्राप्‍त झाले. महायुतीचे पाठबळ हे जनतेच्‍या पाठीशी कायम असल्‍याचा विश्‍वास मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला असल्याचे त्यांच्या प्रसिद्धी विभागाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,906
आश्वी बुद्रुक अपर तहसील कार्यालय राजकारण राधाकृष्ण विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिबिर

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीत अचानक निर्माण होणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या…

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.