Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » छत्रपतींनी जगाला दिशा दाखवली त्यांच्या जयंतीमध्ये कसले राजकारण करता? मंदिर बांधकामासाठी ही जागा देऊ नये यासाठी प्रशासनावर मोठा दबाव : आमदार सत्यजित तांबे
धार्मिक

छत्रपतींनी जगाला दिशा दाखवली त्यांच्या जयंतीमध्ये कसले राजकारण करता? मंदिर बांधकामासाठी ही जागा देऊ नये यासाठी प्रशासनावर मोठा दबाव : आमदार सत्यजित तांबे

मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रसन्न मूर्ती असून हे मंदिर पुढील दोन दिवस सर्वांसाठी खुले राहणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. १७ मार्च – प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहे. त्यांनी जगाला दिशा दाखविली. त्यांच्या जयंतीमध्ये कसले राजकारण करता असा सवाल उपस्थित खरंच शिवजयंती निमित्ताने मंदिर उभारण्यासाठी अनेक अडचणी निर्माण करत प्रशासनावर दबाव टाकण्यात आल्याचे प्रतिपादन पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केले.
रविवारी रात्री संगमनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारापाशी स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा देखावा करण्यात आला आहे. या देखाव्याचे उद्घाटन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तांबे बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत देखाव्यासाठी आलेल्या माजी मंत्री थोरात, आमदार तांबे यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
थोरात, तांबे यांच्यासह माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कांचनताई थोरात, डॉ. जयश्री थोरात, डॉ. मैथिली तांबे, सोमेश्वर दिवटे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासमोर पारंपारिक दांडपट्टा, तलवारबाजीसह साहसी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आई तुळजाभवानीची आरती करत मंदिर देखावा खुला करण्यात आला यावेळी फटाक्यांची मोठी आतिषबाजी देखील करण्यात आली.
आमदार तांबे म्हणाले, शिवजयंती उत्सवानिमित्ताने शिवमंदिर उभारण्यासाठी या जागेवर अनेक अडचणी निर्माण करण्यात आल्या. जागा मिळविण्यासाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करावा लागला. ही जागा आपल्याला मिळू नये यासाठी प्रशासनावर देखील मोठा दबाव टाकला गेला होता. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे दैवत असून या महापुरुषाच्या जयंतीमध्ये कधीही राजकारण नको जात पात धर्म नको. मात्र या निमित्ताने झालेले राजकारण दुर्दैवी आहे.
संगमनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारा जवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी २०१७ मध्ये दुर्गादायी तांबे नगराध्यक्ष असताना नगर परिषदेने ठराव केला तर २०२४ मध्ये आपण ही जागा मंजूर करून घेतली व त्यासाठी निधीची मागणी केली. माजी मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपण येथे उभा करणार आहोत. याचबरोबर संविधान स्मारक शहीद स्मारक क्रांतीज्योती सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. महापुरुषांच्या स्मारकामध्ये श्रेयवाद नको प्रत्येकाने यासाठी योगदान द्यावे.
आपण शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी मागितलेली जागा मिळू नये यासाठी प्रशासनावर प्रचंड दबाव असतानाही त्यांनी मंदिर उभारण्यासाठी परवानगी दिली याबद्दल व सुंदर देखावा केल्याबद्दल तांबे यांनी स्वाभिमानी शहर व तालुका शिवजयंती समितीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
आतिषबाजी आणि देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी, दोन दिवस मंदिर सर्वांसाठी खुले राहणार… स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिर देखावा परिसरात अतिशय सुंदर आरस करण्यात आली असून याचबरोबर महाराजांच्या मंदिरासमोर आई तुळजाभवानीचे मंदिर व मूर्ती बसविण्यात आली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रसन्न मूर्ती असून हे मंदिर पुढील दोन दिवस सर्वांसाठी खुले राहणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,305
जयश्री थोरात दुर्गाताई तांबे बाळासाहेब थोरात शिवजयंती उत्सव सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026

संगमनेरचा ईद ए मिलाद जुलूस शांततेत पार; आयोजक, नागरिक आणि पोलीस प्रशासनाचे कौतुक!

27/08/2026

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar29/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील एमआयडीसी, जामखेड आणि बेलवंडी पोलीस ठाण्याच्या…

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

29/08/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.