Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

August 2, 2026

रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 2, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » न्यूज अपडेट… विधान परिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध, पाच उमेदवार विजयी; यांचा आहे समावेश
राजकारण

न्यूज अपडेट… विधान परिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध, पाच उमेदवार विजयी; यांचा आहे समावेश

२० मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर निवडणूक अधिकारी बिनविरोध निवडून आलेल्या आमदारांच्या नावाची अधिकृत घोषणा करतील.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 18, 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, दि. १८ मार्च: प्रतिनिधी

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे. अर्ज छाननी दरम्यान एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली आहे. बिनविरोध झालेल्या उमेदवारांच्या निवडीची औपचारिकता बाकी आहे.

या निवडणुकीत भाजपचे तीन, शिंदे गटाच्या शिवसेनेचा एक आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उमेदवाराचा विजय झाला आहे.

विजयी उमेदवार – 

 * दादाराव केचे (भाजप)

 * संजय केणेकर (भाजप)

 * संदीप जोशी (भाजप)

 * चंद्रकांत रघुवंशी (शिंदे गट शिवसेना)

 * संजय खोडके (अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस)

महायुतीच्या या पाच उमेदवारा व्यतिरिक्त आणखी एका अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अपक्ष उमेदवाराने सादर केलेल्या अर्जात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली नव्हती. आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आणि नोटरी नसल्यामुळे त्यांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आला.

उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवारचा अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवसाखेर सहा उमेदवारांच्या अर्ज दाखल झाले होते. यातील अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद झाला. तर २० मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर निवडणूक अधिकारी बिनविरोध निवडून आलेल्या आमदारांच्या नावाची अधिकृत घोषणा करतील.

भाजपने संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर यांची उमेदवारी जाहीर केली होती. शिंदे गटाच्या शिवसेनेने चंद्रकांत रघुवंशी आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने संजय खोडके यांच्या नावाची घोषणा केली होती. संजय खोडके हे आमदार सुलभा खोडके यांचे पती आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,590
बिनविरोध विधान परिषद निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
विश्लेषण

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

By अनंत पांगारकरAugust 2, 20260

प्रवीण पुरो  केंद्र सरकारच्या नव्या शिक्षण अभियानांतर्गत शैक्षणिक व्यवस्थेत करण्यात आलेल्या बदलाचे विपरीत आणि दीर्घकालीन…

रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 2, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

August 1, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.