Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यात पुन्हा सहा आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या
प्रशासन

राज्यात पुन्हा सहा आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या

यापूर्वी १५ दिवसांपूर्वी काही जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांच्या बदल्या झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई दि. १८ मार्च : प्रतिनिधी

राज्य सरकारने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून दर ८ ते १५ दिवसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची घोषणा होत आहे. यापूर्वी १५ दिवसांपूर्वी काही जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांच्या बदल्या झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

यामध्ये नागपूरच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त आंचल गोयल यांना मुंबईच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे, तर छत्रपती संभाजीनगरसह इतर जिल्ह्यांमध्येही अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या दोन गटांमधील तणावामुळे शहर चर्चेत आले होते. सध्या तिथली परिस्थिती नियंत्रणात असली तरी आता अतिरिक्त महापालिका आयुक्तांची बदली झाल्याने याबाबत चर्चा सुरू आहे. याशिवाय जळगाव, नांदेड, पालघर आणि गडचिरोली येथील अधिकाऱ्यांच्या बदल्याही जाहीर झाल्या आहेत.

जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही आयएएस अधिकारी रणजित मोहन यादव यांना नवीन पदभार देण्यात आला आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी आणि नवीन नियुक्ती ठिकाणे…

* आंचल गोयल (IAS:RR:2014) – अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नागपूर यांची मुंबई शहराच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.  

* अंकित (IAS:RR:2019) – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती.  

* मीनल करनवाल (IAS:RR:2019) – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती.  

* कवली मेघना (IAS:RR:2019) – प्रकल्प संचालक, ITDP, किनवट आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट उपविभाग, नांदेड यांची नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती.  

* करिश्मा नायर (IAS:RR:2021) – प्रकल्प संचालक, ITDP, जव्हार आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार उपविभाग, पालघर यांची नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती.  

* रणजित मोहन यादव (IAS:RR:2022) – सहाय्यक जिल्हाधिकारी, कुरखेडा उपविभाग, गडचिरोली यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली म्हणून नियुक्ती.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,189
आय ए एस आयएएस बदल्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील भोजापूर प्रकल्पाच्या पूरचारीचा समावेश दमणगंगा–वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात…

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.