Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या विकासाला चालना: परिवहन विभागाशी संबंधित मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद, आमदार सत्यजित तांबे यांची माहिती
बैठक

संगमनेरच्या विकासाला चालना: परिवहन विभागाशी संबंधित मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद, आमदार सत्यजित तांबे यांची माहिती

मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. संगमनेरच्या विकासासाठी हे सर्व निर्णय अत्यंत महत्त्वाचे असून लवकरच त्यांची अंमलबजावणी होईल, असा विश्वास आमदार तांबे यांनी व्यक्त केला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, दि. २४ मार्च – विशेष प्रतिनिधी 

संगमनेर बसस्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागेची उपलब्धता करून दिली. मात्र हे स्मारक अधिक भव्य आणि भव्य दिव्य ठरावे यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याचा मार्ग संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला आमदार सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खताळ उपस्थित होते.

तांबे म्हणाले, २१ ऑगस्ट २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यांनी जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, हे स्मारक अधिक भव्य आणि भव्यदिव्य ठरावे, यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात परिवहन मंत्र्यांशी चर्चा करण्यात आली.

याशिवाय या बैठकीमध्ये संगमनेरसाठी स्वतंत्र आरटीओ कार्यालय असावे, ही प्रदीर्घ मागणी आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तांत्रिक अडचणींमुळे आरटीओ कार्यालय न देता स्वतंत्र “कॅम्प ऑफिस” मंजूर केले. मात्र, हे कॅम्प ऑफिस अद्याप कार्यान्वित झाले नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. हे कॅम्प ऑफिस लवकरात लवकर सुरू करावे आणि सर्व तांत्रिक अडचणी दूर करून संगमनेर व अकोले तालुक्यासाठी स्वतंत्र आरटीओ कार्यालय द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

रात्री जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी बसेस संगमनेर शहरातून न जाता शहराबाहेरील बाह्य वळण मार्गाने जातात, यामुळे संगमनेरकरांना रात्री-बेरात्री शहराबाहेरून जाणाऱ्या महामार्गावर उतरावे लागते. रात्री ९ वाजेनंतर सर्व बसेस संगमनेर शहरातील बसस्थानकात थांबाव्यात, असा शासनाने निर्णय घेतलेला आहे. मात्र, या आदेशांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्याची विनंती सरनाईक यांच्याकडे करण्यात आली.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. संगमनेरच्या विकासासाठी हे सर्व निर्णय अत्यंत महत्त्वाचे असून लवकरच त्यांची अंमलबजावणी होईल, असा विश्वास आमदार तांबे यांनी व्यक्त केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,810
अमोल खताळ छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा परिवहन मंडळ प्रताप सरनाईक राजकारण सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

By Annant Ppangarkar21/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडिया हे आजच्या माहितीच्या युगात अत्यंत प्रभावी माध्यम बनले…

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.