Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बोटा परिसरात स्कॉर्पिओतून होणारी बेकायदेशीर दारू वाहतूक घारगाव पोलिसांकडून उघडकीस; ५ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

21/09/2026

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पुणे-नाशिक रेल्वे आणि एसटीच्या मुद्यावरून संगमनेरमध्ये राजकीय रणकंदन; ‘आमदार साहेब बनवाबनवी थांबवा’, कृती समितीचा आक्रमक इशारा
राजकारण

पुणे-नाशिक रेल्वे आणि एसटीच्या मुद्यावरून संगमनेरमध्ये राजकीय रणकंदन; ‘आमदार साहेब बनवाबनवी थांबवा’, कृती समितीचा आक्रमक इशारा

सर्वोच्च न्यायालयात याचिका फेटाळली गेल्याने आलेल्या नैराश्यातून संगमनेरवासीयांच्या तीन पिढ्यांच्या स्वप्नाला छेद देण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधींनी करू नये, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर:

राज्यभरात एसटी बसेसची अत्यंत केविलवाणी अवस्था झालेली असताना आणि प्रवाशांच्या भरमसाठ तक्रारी असताना, नाशिक-पुणे मार्गावरील बसेसला संगमनेर येथे थांबा मिळवण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. आता आगामी आंदोलनाच्या तोंडावर कमिट्या स्थापन करून केवळ देखावा केला जात असून, हा जनतेच्या आंदोलनाची धार बोथट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पुणे-नाशिक रेल्वे कृती समितीने केला आहे.

परिवहन विभागातर्फे रेल्वेसंदर्भात समिती स्थापन करून जनतेची सरळ सरळ दिशाभूल केली जात आहे. जर राज्य सरकारला हा मार्ग खरोखरच करायचा होता, तर महारेलकडे वर्ग केलेले १ हजार कोटी रुपये माघारी का बोलावले, असा रोकडा सवाल कृती समितीने विचारला आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत हा प्रकल्प रद्द झाल्याचे स्पष्ट केले असताना, संगमनेर नगरपालिकेच्या प्रचारात उतरलेल्या पक्षाच्या युवा खासदाराने संसदेत आवाज का उठवला नाही, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. १ रुपयाचाही निधी न मिळणे आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका फेटाळली गेल्याने आलेल्या नैराश्यातून संगमनेरवासीयांच्या तीन पिढ्यांच्या स्वप्नाला छेद देण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधींनी करू नये, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

पुणे-नाशिक रेल्वे कृती समितीच्या वतीने सतीश खताळ, रवींद्र हासे, प्रवीण हासे, रामेश्वर पानसरे, प्रितम साबळे, अजय हासे, शिवाजी जगताप, विजय उदावंत, अमोल शेलकर, शिवाजी गुंजाळ, निलेश गुंजाळ, प्रकाश कडलग, समीर लामखडे, राहुल गायकर, मोहसीन शेख, अनिल गुंजाळ, संदीप काकड, डॉ. सचिन वाळे, ॲड. अनिल गोडसे, राम अरगडे, अरुण चव्हाण, ओंकार बिडवे, सत्यजित थोरात, प्रदीप हासे आणि प्रवीण काकड यांनी हा इशारा दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,090
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

बोटा परिसरात स्कॉर्पिओतून होणारी बेकायदेशीर दारू वाहतूक घारगाव पोलिसांकडून उघडकीस; ५ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar21/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – वरिष्ठांच्या आदेशानुसार घारगाव पोलिसांनी बोटा परिसरात अवैध धंद्यांवर मोठी कारवाई…

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.