Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प; रेल्वेमंत्र्यांशी बैठकीत तांत्रिक अडचणींवर तोडग्याचे संकेत
राजकारण

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प; रेल्वेमंत्र्यांशी बैठकीत तांत्रिक अडचणींवर तोडग्याचे संकेत

केंद्र व राज्य सरकारची सकारात्मक भूमिका आणि तज्ज्ञ समितीच्या अभ्यासामुळे प्रकल्पातील सर्व अडथळे दूर होऊन संगमनेर परिसरासह संपूर्ण क्षेत्राचे हे बहुप्रतीक्षित स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/08/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर:

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली असून आमदार अमोल खताळ आणि खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीत भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली आहे.

आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या बैठकीत पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या आर्थिक व औद्योगिक विकासासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या प्रकल्पातील तांत्रिक अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रकल्पाच्या प्रस्तावित संरेखनामुळे (अलाईनमेंट) खोडद येथील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (GMRT) प्रकल्पावर होणाऱ्या संभाव्य परिणामांमुळे कामात विलंब होत असल्याचे रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

या तांत्रिक समस्येवर योग्य तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. ही समिती रेल्वे मार्गाच्या संरेखनाचा आणि GMRT वरील परिणामांचा अभ्यास करून अहवाल सादर करणार असून, अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाहीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिले आहे.

हा प्रकल्प उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना देणारा ठरेल, केंद्र व राज्य सरकारची सकारात्मक भूमिका आणि तज्ज्ञ समितीच्या अभ्यासामुळे प्रकल्पातील सर्व अडथळे दूर होऊन संगमनेर परिसरासह संपूर्ण क्षेत्राचे हे बहुप्रतीक्षित स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 544
अमोल खताळ अश्विनी वैष्णव नाशिक पुणे रेल्वे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
श्रद्धांजली

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

By Annant Ppangarkar20/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर येथील जेष्ठ पत्रकार विनोद बूब (वय ७८) यांचे रविवारी…

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.