Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बोटा परिसरात स्कॉर्पिओतून होणारी बेकायदेशीर दारू वाहतूक घारगाव पोलिसांकडून उघडकीस; ५ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

21/09/2026

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये विवाह सोहळ्यांसाठी ‘आचारसंहिता’ लागू; रात्री १० नंतर डीजे बंद
बैठक

संगमनेरमध्ये विवाह सोहळ्यांसाठी ‘आचारसंहिता’ लागू; रात्री १० नंतर डीजे बंद

या प्रसंगी संगमनेर शहर व परिसर परिसरातील मंगल कार्यालये व लॉन्सचे चालक-मालक, मॅनेजर, फोटोग्राफर, आचारी, भटजी यांच्यासह विविध एजन्सीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर:

संगमनेर शहरासह तालुक्यात आता सर्व विवाह सोहळे वेळेत आणि मुहूर्तावर पार पडणार असून रात्री १० वाजेनंतर डीजे व बँड वाजवण्यावर पूर्णपणे बंदी घालणारी नवी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. 

विवाह सोहळ्यांमधील वाढता अनिष्ट पायंडा, वेळेचा अपव्यय आणि कायद्याचे होणारे उल्लंघन रोखण्यासाठी संगमनेर तालुका लॉन्स व मंगल कार्यालय असोसिएशनचे अध्यक्ष गोरख वसंतराव कुटे यांच्या पुढाकारातून आणि संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत लॉन्स येथे आयोजित संयुक्त बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

सध्या विवाह सोहळ्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत कर्कश्श आवाजात चालणारे हळदीचे कार्यक्रम आणि लग्नाची वेळ टळून गेल्यानंतरही निघणाऱ्या मिरवणुकींमुळे पाहुण्यांपासून ते मंगलकार्याशी निगडीत प्रत्येक घटकाला मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सर्व गोष्टींना चाप लावून आपली संस्कृती जपण्यासाठी तसेच कायद्याच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करण्यासाठी लॉन्स व मंगल कार्यालय चालक, केटरर्स, पुरोहित, फोटोग्राफर आणि निवेदक यांची ही विशेष बैठक पार पडली.

कुटे म्हणाले, या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार रात्री १० नंतर डीजे अथवा बँड वाजवणे, रात्री ११ नंतर फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी करणे आणि रात्री साडेअकरानंतर लॉन्स किंवा मंगल कार्यालये उघडी ठेवण्यास सक्त मनाई करण्यात आली असून विवाह सोहळ्याशी निगडीत लॉन्स चालक, भटजी, केटरर, छायाचित्रकार यांच्यासाठीही अंतर्गत नियमावली लागू करण्यात आली आहे.

या बैठकीत संघटनेचे पदाधिकारी अभिजित ढोले, सागर नागरे, रोहिदास धुमाळ, वरूण गुंजाळ, प्रीतम जाधव, ओंकार कुटे, राजू कुटे, भाऊ जाखडी, कैलास जोशी, संकेत मुळे, संदीप शेळके, किरण डोंगरे, सुनील रहाणे, साई दिघे, नीलेश मिसाळ, राजेंद्र गाडेकर, समीर सराफ, निखिल उपासनी, अनिकेत फटांगरे, ऋत्विक रहाणे, उत्कर्ष जोशी, शाम महाराज, चेतन मुळे आणि किशोर रहाणे यांनी विविध मुद्द्यांवर मते मांडून चर्चेत सहभाग घेतला.

या प्रसंगी संगमनेर शहर व परिसर परिसरातील मंगल कार्यालये व लॉन्सचे चालक-मालक, मॅनेजर, फोटोग्राफर, आचारी, भटजी यांच्यासह विविध एजन्सीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,035
गोरख कुटे बैठक लॉन्स
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध धंद्यांवर ‘मोक्का’, ‘एमपीडीए’नुसार कठोर कारवाई करा: अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियांचे संगमनेरात निर्देश

05/09/2026

दंडकारण्य अभियानांतर्गत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करा; वृक्ष संगोपन हीच खरी ईश्वर सेवा: माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे आवाहन

14/07/2026

नाशिक-पुणे रेल्वे रद्द झाल्याने जनतेत संताप; घारगावच्या बैठकीत राजकारणविरहीत तीव्र जन-आंदोलनाचा निर्धार!

29/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

बोटा परिसरात स्कॉर्पिओतून होणारी बेकायदेशीर दारू वाहतूक घारगाव पोलिसांकडून उघडकीस; ५ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar21/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – वरिष्ठांच्या आदेशानुसार घारगाव पोलिसांनी बोटा परिसरात अवैध धंद्यांवर मोठी कारवाई…

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.