Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

05/10/2026

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस
बैठक

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

आमदार अमोल खताळ पाटील यांनी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करताना कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आणि पंचनाम्यांच्या याद्या केवळ ग्रामपंचायतीच्या फलकावर न लावता सोशल मीडियाद्वारे गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/10/2026Updated:05/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

सध्याच्या टंचाईच्या परिस्थितीत सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट गावागावात जाऊन दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांबाबत तत्परतेने कार्यवाही करावी, असा स्पष्ट आदेश देत कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास भाग पाडू नका, असा कडक इशारा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. 

रविवारी संगमनेर येथे आयोजित टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल खताळ पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे आणि गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पशुसंवर्धन विभागाच्या भोंगळ कारभारावर पालकमंत्र्यांनी अत्यंत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. झिरो पशुवैद्यकीय अधिकारी नेमून कारभार चालवणे, लसीकरणासाठी जादा पैसे उकळणे आणि चारा उत्पादनासाठी बियाणे वाटप केलेल्या शेतकऱ्यांची अचूक माहिती न देण्यासारख्या गंभीर बाबी समोर आल्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे यांना पशुसंवर्धन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले.

आगामी सहा महिन्यांचा चारा उत्पादनाचा ठोस आराखडा तयार करण्याचे निर्देश देत महावितरण कंपनीने गरजेच्या ठिकाणी तात्काळ रोहित्र बदलून पुढील एका महिन्यात विजेचे सर्व प्रश्न निकाली काढावेत, अशी सक्त सूचना त्यांनी केली.

जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कागदपत्रांतील आणि प्रत्यक्ष बैठकीत मांडल्या जाणाऱ्या माहितीतील तफावतीवर पालकमंत्र्यांनी बोट ठेवले. या योजनांच्या पूर्णतेसाठी आवश्यक निधीचा त्वरित अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच प्रवरा नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्याबाबत ग्रामस्थांच्या आलेल्या तक्रारींची दखल घेण्यात आली.

याच वेळी साकूर परिसरासाठी २२५ कोटी रुपयांच्या उपसा सिंचन योजनेला लवकरच प्रशासकीय मान्यता मिळणार असून भोजापूर कालवा पूरचारीसाठी ४४ कोटी रुपये मंजूर झाल्याचे आणि नदीजोड प्रकल्पात समावेश झाल्याने निधीची अडचण भासणार नसल्याची माहिती त्यांनी दिली.

नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे सांगत, आमदार अमोल खताळ पाटील यांनी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करताना कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आणि पंचनाम्यांच्या याद्या केवळ ग्रामपंचायतीच्या फलकावर न लावता सोशल मीडियाद्वारे गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 136
अमोल खताळ टंचाई आढावा बैठक राधाकृष्ण विखे पाटील
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

आमदार अमोल खताळ शेतकऱ्यांच्या बांधावर; पिकांसंदर्भात अधिकाऱ्यांना या सूचना

01/10/2026

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सध्याच्या टंचाईच्या परिस्थितीत सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट गावागावात जाऊन दुष्काळ निवारणाच्या…

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

05/10/2026

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.