Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून संगमनेरला ११ कोटी १८ लाखांचा निधी, रस्त्यांसह विविध कामे करणार : आमदार अमोल खताळ
राजकारण

जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून संगमनेरला ११ कोटी १८ लाखांचा निधी, रस्त्यांसह विविध कामे करणार : आमदार अमोल खताळ

निधीमुळे तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार असून, नागरिकांच्या जीवनात सुधारणा होईल, असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. २६ मार्च – प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी ११ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सहकार्याने जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या निधीतून तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास, जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांचे बांधकाम तसेच अन्य नागरी सुविधांची कामे होणार आहेत. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून तालुक्यातील विकास कामांच्या संदर्भात दाखल झालेल्या प्रस्तावांना मंजूरी मिळाल्याने या विकास कामांसाठी हा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आमदार खताळ म्हणाले, तालुक्यातील १९ रस्त्यांसाठी ३ कोटी ७० लाख रुपये मंजूर झाले असून, यामध्ये प्रामुख्याने मौजे चिखली ते केरेवाडी रस्ता (२० लाख रुपये), वडगाव लांडगा ते दातीर वस्ती (३० लाख रुपये), राजापूर ते खतोडे मळा रस्ता (३० लाख रुपये), धांदरफळ खुर्द ते धांदरफळ बुद्रुक पुल दुरुस्ती (४० लाख रुपये), नांदूरीदुमाला ते ठाकरवाडी रस्ता (२० लाख रुपये), निमगाव खुर्द ते चंदनवाडी रस्ता (३० लाख रुपये), सायखिंडी ते कारवाडी रस्ता (२० लाख रुपये), संगमनेर ते झोळे रस्ता (३० लाख रुपये), कासारे ते कानकाटे वस्तीपर्यंत रस्ता (४० लाख), वडझरी ते कारेवाडी रस्ता (३० लाख रुपये), कुंभारदरा ते कर्जुलेपठार रस्ता (३० लाख रुपये), कौठे मलकापूर ते ठाकरवाडी रस्ता (३० लाख रुपये), नांदूरखंदरमाळ ते खैरदरा रस्ता (३० लाख रुपये) ही कामे केली जाणार आहेत.

अन्य महत्वपूर्ण रस्त्यांमध्ये कासारादुमाला ते मंगळापूर शिव रस्त्यासाठी (५० लाख रुपये), वेल्हाळे ते सायखिंडी मोठेबाबा रस्ता (३० लाख रुपये), कोकणगाव ते निझर्णेश्वर देवस्थान (४० लाख रुपये, रायतेवाडी ते हिवरगाव पावसा (५० लाख रुपये), सुकेवाडी ते कसबेवाडी रस्ता (२० लाख रुपये), सावरचोळ ते शिसरगाव धूपे जवळेबाळेश्वर रस्त्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध होत आहे. या रस्त्यांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना शहरात ये-जा करणे सोपे होणार आहे.

तसेच, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या खोल्यांसाठी १ कोटी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून बिरेवाडी, पिंपळगाव कोंझीरा, निळवंडे, डोळासणे, हिवरगाव पावसा, तळेगाव धनगरवाडी, पोखरी हवेली आणि मांडवे बुद्रुक येथील शाळांच्या खोल्यांची कामे पूर्ण होणार आहेत. आमदार खताळ यांच्या स्थानिक विकास निधीतून २ कोटी ८६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीतून सभागृह, गावांचे सुशोभीकरण, सभामंडप, मंदिर दुरुस्ती आणि दशक्रिया विधी घाट यांसारखी सार्वजनिक कामे होणार आहेत.

महायुती सरकारच्या माध्यमातून विकास प्रक्रिया वेगाने सुरू झाली शहरांबरोबर ग्रामीण भागाच्या विकासाला निधी उपलब्ध करून देण्याचे काम सरकारच्या माध्यमातून होत आहे. भविष्यातही अधिकचा निधी तालुक्याच्या पायाभूत सुविधांसाठी उपलब्ध होणार आहे. या निधीमुळे तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार असून, नागरिकांच्या जीवनात सुधारणा होईल, असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,144
अमोल खताळ जिल्हा नियोजन समिती निधी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.