Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डी डिफेन्स क्लस्टरमुळे औद्योगिक विकासाला चालना – राधाकृष्ण विखे पाटील
राजकारण

शिर्डी डिफेन्स क्लस्टरमुळे औद्योगिक विकासाला चालना – राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डीचा विकास आणि औद्योगिक विस्तारासाठी ग्रामस्थांनी विचारविनिमय आणि समन्वयाने निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शिर्डी, दि. ३१ मार्च – 

शिर्डी एमआयडीसीमध्ये सुरू होणाऱ्या डिफेन्स क्लस्टर प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे, तसेच रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होईल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

सावळीविहीर खुर्द येथील शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये डिफेन्स क्लस्टरअंतर्गत ‘निबे ऑर्डनन्स ग्लोबल लिमिटेड’ (शेल फोर्जिंग) कंपनीच्या भूमीपूजन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात आमदार आशुतोष काळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, निबे प्रायव्हेट लिमिटेडचे गणेश निबे, एमआयडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक गणेश राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

डॉ. विखे पाटील यांनी सांगितले की, शिर्डी एमआयडीसीमध्ये डिफेन्स क्लस्टरच्या माध्यमातून नवीन औद्योगिक पर्व सुरू होत आहे. शिर्डी विमानतळावरून रात्रीच्या वेळी विमान उतरण्याची सुविधा सुरू झाल्याने येथील औद्योगिक विकासाला अधिक चालना मिळेल.

एमआयडीसीने डिफेन्स क्लस्टरसाठी मोफत जमीन उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी टाटा कंपनीच्या मदतीने २५० कोटी रुपयांचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे, ज्यामध्ये उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या कुशल मनुष्यबळाला प्रशिक्षण दिले जाईल. पशुसंवर्धन विभागाकडील ३०० एकर जमीन कोपरगाव औद्योगिक वसाहतीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले.

शिर्डीचा विकास आणि औद्योगिक विस्तारासाठी ग्रामस्थांनी विचारविनिमय आणि समन्वयाने निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शिर्डी साईबाबा संस्थानच्या माध्यमातून ११ नंबर चारीच्या विस्तारासाठी २२ कोटी रुपये आणि थीम पार्कसाठी ४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर योजनेमुळे अनेक तरुण स्टार्टअप कंपन्या स्थापन करत आहेत. तरुणांनी जागतिकीकरणामुळे उपलब्ध झालेल्या संधींचा लाभ घेऊन आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले की, शिर्डी एमआयडीसीमुळे परिसरातील स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. गणेश निबे यांनी सांगितले की, डिफेन्स क्लस्टरच्या माध्यमातून पाच लाख बॉम्ब शेलची निर्मिती होणार असून या कंपनीच्या माध्यमातून तीन हजार रोजगार निर्माण होतील. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश जोशी यांनी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 680
भूमिपूजन राधाकृष्ण विखे शिर्डी डिफेन्स क्लस्टर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

By Annant Ppangarkar18/09/20260

आजचे राशिभविष्य ​मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता…

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.