Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या डॉक्टरला फाशी द्या; शिवसेनेचा कठोर इशारा, २४ तासांत कारवाई न झाल्यास ‘शिवसेना स्टाईल’ धडा शिकवणार!
राजकारण

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या डॉक्टरला फाशी द्या; शिवसेनेचा कठोर इशारा, २४ तासांत कारवाई न झाल्यास ‘शिवसेना स्टाईल’ धडा शिकवणार!

शिवसेनेच्या या कठोर भूमिकेमुळे प्रशासनावर आता तातडीने कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे. या गंभीर घटनेत पीडितेला न्याय मिळतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. ७ एप्रिल – प्रतिनिधी
संगमनेरमधील प्रतिष्ठित डॉ. अमोल कर्पे याने अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कारामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी आरोपी डॉ. अमोल कर्पे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी आज शिवसेना आणि महिला आघाडीच्यावतीने पोलीस उप अधीक्षक कुणाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर या सर्व पदाधिकारी, शिवसैनिकांनी डॉ. कर्पे याच्या रुग्णालयात जात निदर्शने केली.
निवेदनात शिवसेनेने स्पष्टपणे म्हटले आहे की, संगमनेर शहर आणि तालुक्यातील आरोग्यसेवेच्या चांगल्या परंपरेला डॉ. अमोल कर्पे याच्या कृत्याने काळीमा फासला आहे. एका निष्पाप अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची घटना अत्यंत निंदनीय असून, याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाइन माध्यम आणि वृत्तपत्राद्वारे ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे.
शिवसेनेने मागणी केली आहे की, डॉ. अमोल कर्पे याचे प्रॅक्टिशनर लायसन्स आणि त्यांच्या रुग्णालयाचा परवाना तातडीने निलंबित करण्यात यावा. तसेच, जिल्हा शल्यचिकित्सक आणि माननीय न्यायाधीश यांच्यामार्फत या प्रकरणी तातडीने कार्यवाही करावी. या गंभीर प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात (फास्टट्रॅक कोर्ट) चालवून आरोपीला कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी प्रशासनाला २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, जर या वेळेत आरोपी डॉक्टर आणि त्याच्या रुग्णालयावर कारवाई झाली नाही, तर शिवसेना आपल्या ‘स्टाईल’ने त्याला धडा शिकवेल. महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या इज्जतीसाठी कायदा व सुव्यवस्था मोडण्याची वेळ आली तरी शिवसेना गप्प बसणार नाही.
महिला आणि मुलींना अशा प्रकारे वागणूक देणाऱ्यांना त्वरित शिक्षा झाली पाहिजे आणि पीडितेला न्याय मिळाला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. तालुक्याचे शासकीय अधिकारी म्हणून आपण या प्रकरणी तातडीने कायदेशीर पाऊले उचलावीत, अशी आमची अपेक्षा आहे.” या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील पाठवण्यात आली आहे.

(बघा व्हिडिओ….)

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2025/04/VID-20250407-WA0009.mp4

यावेळी शिवसेना माजी शहर प्रमुख अमर कतारी यांच्यासह युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, माजी तालुका प्रमुख भाऊसाहेब हासे, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे सेवानिवृत्त सेलचे राज्य कार्यकारी प्रमुख ज्ञानेश्वर गायकर, शिरीष गुंजाळ, शिवसेनेचे राजू सातपुते, वेणुगोपाल लाहोटी, दीपक साळुंखे, संकेत एखंडे आणि शिवसेनेचे असिफ तांबोळी, फैसल सय्यद, विजू सातपुते, प्रकाश गायकवाड, अमोल डुकरे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

शिवसेनेच्या या कठोर भूमिकेमुळे प्रशासनावर आता तातडीने कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे. या गंभीर घटनेत पीडितेला न्याय मिळतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,018
अमोल कर्पे अल्पवयीन मुलीवर अत्याचार निदर्शने निवेदन शिवसेना उद्धव ठाकरे गट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.