Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तरुणाचा लिंबाच्या झाडाला गळफास, पोलिसांनी तासाभरात ओळख पटवली, मृत तरुण नाशिक जिल्ह्यातील
गुन्हेगारी

तरुणाचा लिंबाच्या झाडाला गळफास, पोलिसांनी तासाभरात ओळख पटवली, मृत तरुण नाशिक जिल्ह्यातील

घारगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी तात्काळ सूत्रे फिरवत नाशिक आरटीओ कार्यालयाकडून मोटरसायकलच्या मालकाची माहिती मिळवली. त्यानंतर सटाणा पोलिसांशी संपर्क साधून त्यांनी मयताच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. या प्रयत्नांमुळे अवघ्या तासाभरात मृतदेहाची ओळख पटली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. ९ एप्रिल – प्रतिनिधी

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगांव गावाच्या हद्दीत खंडोबा माळ परिसरातील वनविभागात एका अनोळखी तरुणाचा लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही दुर्दैवी घटना आज, (बुधवार दि. ९ एप्रिल) सकाळी उघडकीस आली.

योगेश भारत आहीरे (वय २५ वर्षे, रा. रामतीर, पो. करे, ता. बागलाण, जि. नाशिक) असे मृत तरुणाचे नाव असून तो पुण्यात एका सुरक्षा कंपनीत कामाला होता आणि तो आपल्या गावी जात असतानाही घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे.

घारगांव परिसरातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या खंडोबा माळ परिसरातून सकाळी ये-जा करणाऱ्या नागरिकांना लिंबाच्या झाडाला एक मृतदेह लटकलेला दिसला. कुरकुंडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष पप्पू चौगुले यांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि घारगांव पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच घारगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस कॉन्स्टेबल बाबू गोडे, महादेव हांडे, आणि चालक सुरेश मुसळे यांनी त्वरित घटनास्थळ गाठले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठवला.

दरम्यान, घटनेची माहिती परिसरात पसरताच मोठ्या संख्येने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. मृत तरुण अनोळखी होता. त्याच्या कमरेला एका मोटरसायकलची चावी होती आणि काही अंतरावर एम एच १५ एच आर ८०५२ क्रमांकाची मोटरसायकल उभी होती. त्यामुळे सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते.

मात्र, घारगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी तात्काळ सूत्रे फिरवत नाशिक आरटीओ कार्यालयाकडून मोटरसायकलच्या मालकाची माहिती मिळवली. त्यानंतर सटाणा पोलिसांशी संपर्क साधून त्यांनी मयताच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. या प्रयत्नांमुळे अवघ्या तासाभरात मृतदेहाची ओळख पटली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घारगांव पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,354
गळफास
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

By Annant Ppangarkar18/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उपसा आणि छुप्या मार्गाने होणाऱ्या…

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.