Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दिमाखदार सामुदायिक विवाह सोहळा: मालपाणी उद्योग समूहाच्या उपक्रमातून ३५ जोडप्यांनी बांधली जन्मगाठ
सामाजिक

दिमाखदार सामुदायिक विवाह सोहळा: मालपाणी उद्योग समूहाच्या उपक्रमातून ३५ जोडप्यांनी बांधली जन्मगाठ

यावर्षी ३१ हिंदू आणि ४ बौद्ध जोडप्यांनी विवाहबंधनात प्रवेश केला असून, यात १४ पदवीधर जोडप्यांचा समावेश आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
मालपाणी उद्योग समूहाने सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या भव्य सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये ३५ जोडप्यांनी हजारो पाहुण्यांच्या साक्षीने आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली. या सोहळ्याने आकर्षक सजावट, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि उत्साही वातावरणाने उपस्थितांची मने जिंकली.
अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे आयोजित या सोहळ्याच्या प्रवेशद्वारापासून विवाहस्थळापर्यंत केलेली नेत्रदीपक सजावट लक्ष वेधून घेत होती. आलेल्या सात हजारांहून अधिक पाहुण्यांसाठी उत्तम भोजन व्यवस्था आणि मनोरंजनासाठी संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.
या शुभप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, डॉ. जयश्री थोरात, यांच्यासह मालपाणी परिवारातील ललितादेवी व सुवर्णा मालपाणी, राजेश मालपाणी, डॉ. संजय मालपाणी, गिरीश मालपाणी, हर्ष मालपाणी, अनुराधा मालपाणी, रचना मालपाणी, सुनिता मालपाणी आणि इशिता मालपाणी यांनी नववधू-वरांना आशीर्वाद दिले.
डॉ. सुधीर तांबे यांनी मालपाणी परिवाराच्या २८ वर्षांपासूनच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या परंपरेचे कौतुक केले. आमदार अमोल खताळ यांच्यावतीने बोलताना नीलम खताळ यांनी मालपाणी समूहाच्या या उपक्रमामुळे अनेक पालकांना दिलासा मिळाल्याचे सांगितले. डॉ. जयश्री थोरात यांनी या सोहळ्याच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल मालपाणी परिवाराचे अभिनंदन केले.
डॉ. संजय मालपाणी यांनी सांगितले की, यावर्षी ३१ हिंदू आणि ४ बौद्ध जोडप्यांनी विवाहबंधनात प्रवेश केला असून, यात १४ पदवीधर जोडप्यांचा समावेश आहे. भाऊ जाखडी यांनी हिंदू जोडप्यांचे, तर बौद्धाचार्य भाऊसाहेब देठे यांनी बौद्ध जोडप्यांचे विवाह विधी पार पाडले.
राम पाटसकर व मुरारी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले, तर गिरीश मालपाणी यांनी आभार मानले.
या विवाह सोहळ्याची काही वैशिष्ट्ये: केवळ एका रुपयात नोंदणी, १०० स्वयंसेवकांचे योगदान, आकर्षक विवाहस्थळ, शाही मिरवणूक, वधू-वरांची निवास व्यवस्था, सेल्फी पॉईंट, वातानुकूलित मंडप, पारंपरिक पद्धतीने विवाह, प्रत्येक जोडप्याला २५ हजारांच्या संसारोपयोगी भेटवस्तू आणि रोपांची भेट.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,360
मालपाणी उद्योग समूह संजय मालपाणी सामुदायिक विवाह सोहळा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पुण्यात विविध मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाला…

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.