Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धर्मांधतेच्या वादळात संगमनेरात ‘समतेची मिसळ’, हजारो नागरिकांचा प्रतिसाद… माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेला यश
महाराष्ट्र संवाद विशेष

धर्मांधतेच्या वादळात संगमनेरात ‘समतेची मिसळ’, हजारो नागरिकांचा प्रतिसाद… माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेला यश

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मानवता धर्माची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. जयश्री थोरात यांनी 'समतेची मिसळ' या उपक्रमाची कल्पना मांडली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/05/2025Updated:01/05/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर

राज्यात आणि देशात धार्मिक तेढ वाढीस लावण्याचे प्रयत्न सुरू असताना, संगमनेरने एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवून सामाजिक सलोख्याचे उदाहरण दिले आहे. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि काँग्रेस अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘समतेची मिसळ’ या सर्वधर्मीय कार्यक्रमाला गुरुवारी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात तब्बल १३ हजारांहून अधिक संगमनेरकरांनी एकत्र येत समतेच्या मिसळीचा आस्वाद घेतला आणि एकतेचा संदेश दिला.

संगमनेर बस स्थानकासमोर, नवीन नगर रोड येथे संगमनेर तालुका युवक काँग्रेस आणि शहरातील विविध सामाजिक घटकांनी एकत्रितपणे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘समतेची मिसळ’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उद्योजक राजेश मालपाणी, काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आणि संगमनेरातील ६० हून अधिक समाजांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहराने नेहमीच सुसंस्कृत आणि समृद्ध शहर म्हणून ओळख मिळवली आहे. येथील विकास योजनांमध्ये नेहमीच बंधुभाव आणि सुरक्षिततेच्या वातावरणाला प्राधान्य दिले गेले आहे. याच परंपरेला पुढे नेत, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मानवता धर्माची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. जयश्री थोरात यांनी ‘समतेची मिसळ’ या उपक्रमाची कल्पना मांडली.

या उपक्रमात शहरातील आणि तालुक्यातील विविध समाजबांधवांनी उत्स्फूर्तपणे मटकी, पाव, मसाले, ताक, मिरची, पाणी, शेंगदाणे, कैरी, मिठावडा, मठ्ठा, कांदे आणि टोमॅटो अशा अनेक वस्तू मोठ्या प्रमाणात दान केल्या. शहरातील आणि तालुक्यातील हजारो नागरिक, विशेषतः महिलांनी मोठ्या आनंदाने एकत्र येत या समतेच्या मिसळपावचा एकत्रितरित्या आस्वाद घेतला.

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “युवक काँग्रेसच्या प्रयत्नातून आणि विविध समाजातील नागरिकांच्या एकत्रीकरणामुळे हा उपक्रम यशस्वी झाला आहे. यात कोणताही भेदभाव नाही, केवळ एकता आहे. भारतात सामाजिक विविधता असली तरी, मानवतेचा धर्म अधिक बलवान असणे गरजेचे आहे आणि ही एकत्रित मिसळ त्याच भावनेचे प्रतीक आहे. वारकरी संप्रदायात जसा काला पवित्र मानला जातो, त्याचप्रमाणे ही समतेची मिसळ एकतेचा संदेश देणारा प्रसाद आहे. संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान विभूतींनी समतेचा विचार महाराष्ट्रातून देशाला दिला आहे आणि ‘समतेची मिसळ’ हा उपक्रम त्याच विचारांना पुढे नेणारा आणि देशाला दिशा देणारा आहे.”

डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले की, “माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका नेहमीच एक परिवार म्हणून राहिला आहे. काही लोक जाणीवपूर्वक समाजात जातीभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा भेद नष्ट करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. मानव धर्म हा सर्वात पवित्र धर्म आहे आणि तो जपण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे.”

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, “महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान समाजसुधारकांच्या विचारांची आणि संस्कारांची मोठी परंपरा आहे. जातीच्या नावावर होणारे राजकारण अत्यंत चुकीचे आहे. मानवता धर्म हा सर्वात मोठा असून तो जपण्यासाठीच ‘समतेची मिसळ’ हा उपक्रम सर्वांनी मिळून आयोजित केला आहे. शहरातील आणि तालुक्यातील सर्व समाजबांधवांनी यात सक्रिय सहभाग घेतला आणि विविध वस्तू देऊन या समतेच्या मिसळीला आकार दिला. आपल्याला याच एकजुटीने पुढे जायचे आहे.”

दुर्गाताई तांबे यांनी ‘सौ शहरी एक संगमनेरी’ या उक्तीचा उल्लेख करत सांगितले की, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर आणि तालुक्याने नेहमीच विविध उपक्रमांच्या माध्यमातून ही एकतेची परंपरा जपली आहे.

या कार्यक्रमात काँग्रेस, युवक काँग्रेस आणि विविध युवक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सहभागी झालेल्या सर्व संगमनेरकरांचे स्वागत केले आणि त्यांना समतेच्या मिसळीचा आस्वाद दिला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,741
उपक्रम जयश्री थोरात बाळासाहेब थोरात समतेची मिसळ सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पुण्यात विविध मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाला…

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.