महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
आमदार अमोल खताळ यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र दिनापासून शिवसेनेच्यावतीने (शिंदे गट) संगमनेर शहरात सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली आहे. अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी दिली.

सूर्यवंशी यांनी सांगितले की, आमदार अमोल खताळ पाटील यांनी संगमनेर शहर आणि तालुक्यातून एक लाख सभासद नोंदणी करण्याचा निर्धार केला आहे. या अनुषंगाने, संगमनेर शहरात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली “गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक” ही संकल्पना सदस्य नोंदणीच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
गुरुवारी (१ मे) रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून, संगमनेर बस स्थानकापासून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली. त्यानंतर गणेश नगर, जनता नगर, इंदिरानगर यांसारख्या विविध भागांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. आमदार खताळ यांच्या वाढदिवसापर्यंत संगमनेर तालुक्यातून एक लाख सभासद नोंदणी करण्याचा निर्धार शहर आणि तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे.
बस स्थानकावर सदस्य नोंदणीवेळी नव्या-जुन्या शिवसैनिकांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आमदार खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिवकार्य सदस्य नोंदणीसाठी शक्य होईल तिथे पोहोचेल आणि जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करेल. सदस्य नोंदणीच्या माध्यमातून आम्ही तालुक्यात जास्तीत जास्त घरांपर्यंत पोहोचणार आहोत.

यावेळी कृष्णा हासे, भूषण नरवडे, समीर ओझा, सुनीत डेरे, सोहम नेवासकर, रोहित जेधे, पप्पू तेजी, किरण पवार, गोलू जेधे, रामभाऊ लहाने, ओम नाकील, अक्षय सस्कर, रोहित रासने, महेश शिंदे, यश डावखरे, कार्तिक तोरकडी, विधेय माने, अवधूत दुर्गुळे आदीसह शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.
संगमनेरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर अमोल खताळ यांनी आत्तापर्यंतच्या इतिहासात प्रथमत:च संगमनेरच्या बालेकिल्लाला खिंडार पाडत मोठा विजय मिळविला. खताळ यांच्या रूपाने शिवसेनाच नव्हे तर विरोधकांना प्रथमतः या मतदारसंघात लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यामुळे खताळ यांच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाची बांधणी या मतदारसंघात आता सुरू झाली आहे.



