Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » समाज कल्याण खाते हवेच कशाला? मंत्री शिरसाठांचा संतप्त सवाल, निधी कपातीवरून सरकारवर नाराजी
राजकारण

समाज कल्याण खाते हवेच कशाला? मंत्री शिरसाठांचा संतप्त सवाल, निधी कपातीवरून सरकारवर नाराजी

जर समाज कल्याण खात्याची गरज नसेल, किंवा निधीच द्यायचा नसेल, तर ते खाते बंद केले तरी चालेल," असे शिरसाट म्हणाले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – छत्रपती संभाजीनगर

समाज कल्याण विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून तब्बल ७४६ कोटी रुपये ‘लाडकी बहीण’ योजनेकडे वळवल्याने, मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “हे कृत्य बेकायदा आणि अन्यायकारक आहे. या निधी वळवण्याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. शिष्यवृत्ती कशाला द्यायची? वसतिगृहे कशाला चालवायची?” असा संतप्त सवाल शिरसाट यांनी केला.

“पूर्वीही माझ्या खात्यातून सात हजार कोटी रुपये वळवले गेले, याची मला कल्पनाही नव्हती. जर समाज कल्याण खात्याची गरज नसेल, किंवा निधीच द्यायचा नसेल, तर ते खाते बंद केले तरी चालेल,” असे शिरसाट म्हणाले.

असा निधी वळवणे नियमबाह्य आहे. पण अर्थ खात्याला जे वाटते तेच खरे, त्यांची मनमानी सुरू आहे, अशा शब्दांत त्यांनी अजित पवार यांच्या खात्याविषयी नाराजी व्यक्त केली. “हे कायद्यानुसार करतो आहोत, असे ते दाखवत आहेत, पण या कृतीला माझा विरोध आहे. सहन करण्याची एक मर्यादा असते. त्यापेक्षाही जास्त निधी वळवला जात असेल, तर शिष्यवृत्ती कशाला? खातेच नसेल, तरी चालेल ना,” असे तिरकस विधानही शिरसाट यांनी केले.

मार्च अखेरीस निधी वाटप करताना अर्थ खात्याने केलेल्या कपातीवर शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना फुटीच्या वेळी अजित पवार यांच्यावर टीका झाली होती, आणि आता पुन्हा अर्थ खात्यावर टीका होत आहे. या निधी कपातीवरून माध्यमांमध्ये नाराजी व्यक्त झाल्यानंतर राजकीय पटलावर त्याचे पडसाद उमटले आहेत.

निधी कपातीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीची बैठक घेण्यासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, “नियमानुसार आदिवासी विभागाला निधी द्यावाच लागतो. असा निधी वळवल्याने या खात्यावर अन्याय होईल. सरकारमधून बाहेर पडताना ज्यांच्या नावाने ओरड केली आणि नवे सरकार स्थापन केले, त्यात आता तीन पक्ष आहेत. त्यामुळे संजय शिरसाट यांच्याकडे तक्रार करण्यासाठी काही उरले नाही. जर शिरसाट अर्थ खात्यावर बोलत असतील, तर मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घ्यावी.”

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 707
जयंत पाटील निधी राजकारण संजय शिरसाठ समाज कल्याण विभाग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी…

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.