Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदारांच्या आदेशाला न जुमानणाऱ्या महसूल व पोलीस प्रशासनाची निष्क्रियता समोर; आमदार खताळ यांनी स्वतः पकडला अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर, तिघांविरोधात गुन्हा दाखल
गुन्हेगारी

आमदारांच्या आदेशाला न जुमानणाऱ्या महसूल व पोलीस प्रशासनाची निष्क्रियता समोर; आमदार खताळ यांनी स्वतः पकडला अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर, तिघांविरोधात गुन्हा दाखल

गेल्या आठवड्यात आमदार अमोल खताळ यांनी पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत संगमनेर शहर व तालुक्यात सुरू असलेले सर्वच प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले मात्र या आदेशाला न जुमानता संगमनेर मधील अवैध धंदे राजरोसपणे सुरूच आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/05/2025Updated:05/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर

संगमनेर तालुक्यातील महसूल आणि पोलीस प्रशासनाची निष्क्रियता पुन्हा एकदा समोर आली आहे. आमदारांच्या स्पष्ट आदेशानंतरही अवैध वाळू वाहतूक सर्रास सुरू असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर, आमदार अमोल खताळ यांनी स्वतः कारवाई करत रविवारी रात्री समनापूर येथून वाळू भरून रायतेवाडीकडे निघालेला डंपर तनपुरवाडी रस्त्यावर पकडला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी दोन वाळू तस्करांसह डंपर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहितीनुसार, आमदार अमोल खताळ हे रायतेवाडी येथे एका कार्यक्रमासाठी रविवारी रात्री जात असताना त्यांना तनपुरवाडी रस्त्यावर वाळूने भरलेला डंपर येताना दिसला. तात्काळ त्यांनी आपले वाहन थांबवून डंपर चालकाची विचारपूस केली असता, त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर आमदार खताळ यांनी तातडीने तहसीलदार धीरज मांजरे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली आणि पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

या घटनेनंतर महसूल आणि पोलीस पथक काही वेळानंतर घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाळूने भरलेला सुमारे १० लाख रुपये किमतीचा डंपर आणि १५ हजार रुपये किमतीची ३ ब्रास वाळू असा एकूण १० लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

https://x.com/amolkhatalpatil/status/1919318640760967588?t=78BChs-rr2hWIBRikxBOiQ&s=19

या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी डंपर चालक अरबाज इसाक इनामदार (वय २४, रा. सावरगाव घुले, ता. संगमनेर), वाळू तस्कर शुभम सारंगधर वामन (रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) आणि गोरख हासे (पूर्ण नाव अज्ञात, रा. समनापूर) यांच्या विरोधात पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भांगरे करत आहेत.

पोलिसांची एफआयआर अद्याप समोर नाही… दरम्यान या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आमदार खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली असली तरी या प्रकरणातील एफआयआर मात्र अद्याप समोर आलेली नाही.

आमदारांचे आदेश आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह… गेल्या आठवड्यात आमदार अमोल खताळ यांनी पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत संगमनेर शहर व तालुक्यात सुरू असलेले सर्वच प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले मात्र या आदेशाला न जुमानता संगमनेर मधील अवैध धंदे राजरोसपणे सुरूच आहे. तसेच संगमनेर तालुक्यात प्रवरा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. मागील दीड ते दोन महिन्यांपूर्वी आमदार अमोल खताळ यांनी जोर्वे नाक्याजवळ वाळूने भरलेला पिकअप पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला होता. त्यानंतर इतक्या कमी कालावधीत पुन्हा आमदारांना स्वतः वाळू वाहतूक करणारा डंपर पकडावा लागल्याने पोलीस आणि महसूल प्रशासन नेमके काय करत आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,085
अमोल खताळ कारवाई दुर्लक्ष वाळू तस्करी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- वैद्यकीय क्षेत्र हे केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे एक अत्यंत प्रभावी माध्यम…

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.