Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अमेरिकेच्या दबावानंतर भारत-पाक शस्त्रबंदी जाहीर
महाराष्ट्र संवाद विशेष

अमेरिकेच्या दबावानंतर भारत-पाक शस्त्रबंदी जाहीर

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स अकाऊंटवरून ट्विट करत भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / नवी दिल्ली 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी स्थळं नष्ट करुन ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे प्रत्युत्तर दिलं होतं. गेल्या तीन-चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला होता. भारत-पाकिस्तान सीमेवर युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती. अखेर या युद्धाला पूर्णविराम मिळाला आहे. भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी सहमत झाले आहे.

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनीही युद्धबंदीची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितलं, पाकिस्तानच्या डीजीएमओने ३.३५ मिनिटांनी भारतीय डीजीएमओला फोन केला. चर्चेनंतर आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून युद्धबंदी लागू झाली आहे. जमीन, हवा आणि समुद्रावरील सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्यात आली आहे. दोन्ही देशांमध्ये १२ मे रोजी डीजीएमओ स्तरावरील चर्चा होणार आहे.

इतर कोणत्याही ठिकाणी इतर कोणत्याही मुद्द्यावर वाटाघाटी करण्याचा निर्णय झालेला नाही. शनिवारी एअर कमोडोर रघु आर नायर, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषद घेतली.

पत्रकार परिषदेत भारताचे सर्व हवाई तळ सुरक्षित असल्याची पुष्टी देण्यात आली आहे. एस-४०० पूर्णपणे सुरक्षित आहे. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. रघु आर नायर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, समुद्र, हवाई आणि जमिनीवरील सर्व लष्करी कारवाया थांबवण्यासाठी एक करार झाला आहे.

भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाला या कराराचं पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारताने हा करार पूर्ण जबाबदारीने अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु कोणत्याही चिथावणीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर तयार आहे, असंही ते म्हणाले.

कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, गेल्या १२ तासांत पाकिस्तानचं खूप नुकसान झालं आहे. भारतीय सैन्याने लष्करी पायाभूत सुविधांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. पाकिस्तानने अनेक स्तरावर खोटे पसरवण्याचा प्रयत्न केला. भारताने कोणत्याही मशिदीला लक्ष्य केलं नाही. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे.

विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पाकिस्तानकडून ब्राह्मोस तळाचं नुकसान झाल्याचं वृत्त पूर्णपणे खोटं आहे. आम्ही पाकिस्तानची संरक्षण व्यवस्था नष्ट केली आहे. भारतीय सैन्य सुरक्षा प्रदान करण्यास सक्षम आहे. आम्ही कोणत्याही धार्मिक स्थळाचं नुकसान केलेलं नाही. पाकिस्तानच्या अनेक हवाई तळांचे नुकसान झालं आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स अकाऊंटवरून ट्विट करत भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. ट्रम्प यांनी लिहिलं की, अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या प्रदीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्ताननं पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. कॉमन सेन्स आणि ग्रेट इंटेलिजन्स वापरल्याबद्दल दोन्ही देशांचं त्यांनी अभिनंदन केलं.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 874
भारत पाकिस्तान शस्त्रबंदी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पुण्यात विविध मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाला…

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.