Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचा फुसका बार; वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांचा थेट हल्लाबोल

June 15, 2026

सत्ताधारी अन् विरोधक आमनेसामने येणार! २२ जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

June 15, 2026

गगनगिरी महाराजांच्या सप्ताहाची सांगता; निसर्गाचे जतन व संवर्धनाचा संदेश… निसर्ग जपणे हीच गगनगिरी महाराज व ईश्वराची खरी सेवा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाकपच्या संगमनेर तालुका सचिवपदी पुन्हा कॉम्रेड प्रताप सहाणे; पक्ष वाढीसाठी प्रयत्नांवर भर
राजकारण

भाकपच्या संगमनेर तालुका सचिवपदी पुन्हा कॉम्रेड प्रताप सहाणे; पक्ष वाढीसाठी प्रयत्नांवर भर

त्रैवार्षिक परिषदेत पुढील तीन वर्षांसाठीची कार्यकारणी व तालुका कौन्सिल स्थापन करण्यात आली. कॉम्रेड प्रताप सहाणे यांची सेक्रेटरीपदी, तर कॉम्रेड भिका वाघ व कॉम्रेड सयाजी कानवडे यांची एकमताने सहसेक्रेटरीपदी निवड करण्यात आली. त्याचबरोबर किसान सभेच्या सेक्रेटरीपदी कॉम्रेड नारायण मेमाने यांचीही फेर निवड करण्यात आली.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 3, 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) संगमनेर तालुका सचिवपदी कॉम्रेड प्रताप सहाणे (सर) यांची पुढील तीन वर्षांसाठी एकमताने फेर निवड करण्यात आली आहे. संगमनेर येथील लालबावटा कार्यालयात आयोजित त्रैवार्षिक परिषदेत ही निवड प्रक्रिया पार पडली, यावेळी पक्षाचे सभासद उपस्थित होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते कॉम्रेड भिका वाघ होते.
सुरुवातीला मागील तीन वर्षांच्या कालखंडात दिवंगत झालेले पक्ष सभासद आणि पुरोगामी चळवळीतील नेते व कार्यकर्ते यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर, तंबाखू कामगार युनियनचे सरचिटणीस आणि फॉरेस्ट वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड ॲड. ज्ञानदेव सहाणे यांनी प्रास्ताविक केले. भाकपचे सेक्रेटरी कॉम्रेड प्रताप सहाणे यांनी मागील तीन वर्षांतील घडामोडींचे अहवाल वाचन केले. यावेळी त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे म्हटले.
या त्रैवार्षिक परिषदेसाठी जिल्हा सचिव कॉम्रेड ॲड. बन्सी सातपुते, अकोल्याचे ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड कारभारी उगले, कॉम्रेड निवृत्ती दातीर, कॉम्रेड लक्ष्मण नवले हे उपस्थित होते. परिषदेमध्ये कॉम्रेड अशोक डुबे यांनी वंचित फॉरेस्ट वाहतूकदारांचे प्रश्न उपस्थित केले. कॉम्रेड सयाजी कानवडे यांनी फॉरेस्ट चळवळ तालुक्यापुरती मर्यादित न ठेवता ती जिल्हा आणि महाराष्ट्रात सुरू व्हावी अशी भूमिका मांडली. कॉम्रेड भास्करराव पावसे यांनी पूर्वीची चळवळ आणि आत्ताची चळवळ यात खूप तफावत असून संघटना मजबूत करणे आवश्यक असल्याचे सांगितले. फॉरेस्ट कार्यकर्ते कॉम्रेड बाबासाहेब पंडित यांनीही आपले विचार व्यक्त केले.
कॉम्रेड कारभारी उगले यांनी पक्षाची घटना आणि कार्यपद्धती नव्याने शिकवावी लागेल असे मत व्यक्त केले. प्रत्येकाने पक्षाचे हित जपले पाहिजे आणि चांगल्याला चांगले म्हणायला शिकले पाहिजे. तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर पक्षाची बांधणी करण्यात यावी आणि कम्युनिस्ट पक्षाचा सभासद हीच पक्षाची ताकद आहे. पूर्ण वेळ कार्यकर्ते तयार करावे असे त्यांनी नमूद केले.
जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड बन्सी सातपुते यांनी जिल्ह्याच्या परिषदेवर संगमनेरहून कमीत कमी २० प्रतिनिधी पाठवावेत असे सांगितले. भाकप हा पक्ष गरीब लोकांच्या पाठीमागे उभा राहणारा पक्ष आहे. शेतकरी, आरोग्य, दलित, महिला, आदिवासी या सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र येणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. जिल्ह्यात फॉरेस्ट वाहतूकदारांची संघटना स्थापन करून जमिनीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले.
या परिषदेसाठी कॉम्रेड एकनाथ खालेकर, कॉम्रेड शिवाजी मेंगाळ, कॉम्रेड रंगनाथ लांबहाते, कॉम्रेड सोनबा मेंगाळ, कॉम्रेड दशरथ भूतांबरे, कॉम्रेड दिलीप वर्षे, कॉम्रेड मेमाणे सर, कॉम्रेड संजय जाधव सर, कॉम्रेड यादव पावसे, कॉम्रेड भाऊ डुबे, कॉम्रेड भास्कर पावसे, कॉम्रेड अंकुश पंडित, कॉम्रेड दशरथ हासे, कॉम्रेड बापू कानवडे, कॉम्रेड लहानू हासे, कॉम्रेड नितीन मेंगाळ, कॉम्रेड लक्ष्मण रोडे, कॉम्रेड गणपत रोडे, कॉम्रेड रघुनाथ पवार इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच महिला कार्यकर्त्यांचाही या परिषदेत समावेश होता.
या त्रैवार्षिक परिषदेत पुढील तीन वर्षांसाठीची कार्यकारणी व तालुका कौन्सिल स्थापन करण्यात आली. कॉम्रेड प्रताप सहाणे यांची सेक्रेटरीपदी, तर कॉम्रेड भिका वाघ व कॉम्रेड सयाजी कानवडे यांची एकमताने सहसेक्रेटरीपदी निवड करण्यात आली. त्याचबरोबर किसान सभेच्या सेक्रेटरीपदी कॉम्रेड नारायण मेमाने यांचीही फेर निवड करण्यात आली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 646
पदाधिकारी निवडी भाकप
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचा फुसका बार; वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांचा थेट हल्लाबोल

June 15, 2026

सत्ताधारी अन् विरोधक आमनेसामने येणार! २२ जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

June 15, 2026

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचा फुसका बार; वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांचा थेट हल्लाबोल

By अनंत पांगारकरJune 15, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेने ज्या अपेक्षेने आणि विश्वासाने त्यांना निवडून…

सत्ताधारी अन् विरोधक आमनेसामने येणार! २२ जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

June 15, 2026

गगनगिरी महाराजांच्या सप्ताहाची सांगता; निसर्गाचे जतन व संवर्धनाचा संदेश… निसर्ग जपणे हीच गगनगिरी महाराज व ईश्वराची खरी सेवा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 15, 2026

गुलाबाचे फूल अन् हाती नवे पुस्तक; अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत!

June 15, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.