Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026

आज, शनिवार १८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 18, 2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

July 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगर जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’: ४ ते ७ जून दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन
महाराष्ट्र संवाद विशेष

अहिल्यानगर जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’: ४ ते ७ जून दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जवळचं तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथील दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री), ०२४१- २३२३८४४ अथवा २३५६९४० या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 4, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर – 

अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ४ ते ७ जून या कालावधीत विजांच्या कडकडाटासह वादळे, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा झाडांजवळ उभं राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. गडगडाटी वादळादरम्यान आणि विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांच्यापासून दूर राहावे. तसेच, मोकळं मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विद्युतवाहिनी किंवा ट्रान्सफॉर्मरजवळ थांबू नये.

सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या किंवा लोंबकळणाऱ्या केबल्सपासून दूर राहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्ज) कोसळून होणारे अपघात टाळण्यासाठी दक्षता म्हणून होर्डिंग्जच्या आजूबाजूला थांबू नका आणि योग्य ती काळजी घ्या. विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास, सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने कान झाकावे आणि डोकं दोन्ही गुडघ्यांमध्ये झाकावे, जेणेकरून जमिनीशी कमीतकमी संपर्क राहील.

धरण आणि नदी क्षेत्रात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. धरणाच्या किंवा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये. धोकादायक ठिकाणी ‘सेल्फी’ काढणं टाळावं.

वादळी वारा, पाऊस आणि गारपीट यामुळे शेतीमालाचं नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळेत नियोजन करावं. शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा तसं नियोजन केलं असेल, तर मालाचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे. वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यांपासून स्वतःसह जनावरांचं संरक्षण होईल यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जवळचं तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथील दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री), ०२४१- २३२३८४४ अथवा २३५६९४० या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 743
पाऊस येलो अलर्ट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026

भाकरीच्या भुकेने आणि जगण्याच्या वेदनेतून निर्माण झालेले नारायण सुर्वे यांचे साहित्य माणसाला जगण्याची ताकद देते : ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे

July 14, 2026

दोन फुटांवर मृत्यूचा थरार! आश्वी खुर्द येथे क्षिरसागर दाम्पत्य थोडक्यात बचावले; दोन विभागांच्या ढकलाढकलीत नागरिकांचा जीव टांगणीला

July 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

By अनंत पांगारकरJuly 18, 20260

नवी दिल्ली: देशातील विविध परीक्षांमधील अनियमिततेच्या विरोधात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी…

आज, शनिवार १८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 18, 2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

July 17, 2026

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.