Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दोन फुटांवर मृत्यूचा थरार! आश्वी खुर्द येथे क्षिरसागर दाम्पत्य थोडक्यात बचावले; दोन विभागांच्या ढकलाढकलीत नागरिकांचा जीव टांगणीला
महाराष्ट्र संवाद विशेष

दोन फुटांवर मृत्यूचा थरार! आश्वी खुर्द येथे क्षिरसागर दाम्पत्य थोडक्यात बचावले; दोन विभागांच्या ढकलाढकलीत नागरिकांचा जीव टांगणीला

महावितरण आणि पाटबंधारे विभाग यांच्यातील अंतर्गत वादामुळे हा प्रश्न प्रलंबित आहे. महावितरण सदर झाडे पाटबंधारे विभागाच्या जागेत असल्याचे सांगून जबाबदारी झटकते, तर पाटबंधारे विभाग वीजवाहिन्यांची सुरक्षा ही महावितरणचे काम असल्याचे सांगते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/07/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
आश्वी:
पावसाळा सुरू होताच आश्वी खुर्द आणि परिसरात महावितरणच्या गलथान कारभाराचे दर्शन घडू लागले असून, रविवारी सकाळी एका शेतकरी दाम्पत्याला मृत्यूचा थरारक अनुभव आला.
आश्वी खुर्द येथील प्रगतशील शेतकरी रामनाथ क्षिरसागर (वय ४४) आणि त्यांच्या पत्नी योगिता क्षिरसागर (वय ३८) हे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आपल्या गायींसाठी चारा कापत असताना, त्यांच्या अवघ्या दोन फुटांवर ११ केव्हीची उच्चदाब वीजवाहिनी अचानक तुटून कोसळली. सुदैवाने या तारेला रबराचे आवरण असल्याने आणि दाम्पत्य काही अंतरावर असल्याने एक मोठा अनर्थ टळला. मुख्य वीजवाहिनी जमिनीवर पडताना मोठा स्फोट झाला आणि हवेत ठिणग्या उडाल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे नऊ वर्षांपूर्वी याच परिसरात वीजवाहिनी अंगावर पडल्याने मृत्यू पावलेले शेतकरी रमेश लहानू शिंदे यांच्या दुर्दैवी अपघाताची आठवण पुन्हा ताजी झाली आहे.
ही घटना जगुमाई–पाचमोऱ्या ओढा परिसरात, प्रवरा उजव्या कालव्यालगत असलेल्या क्षिरसागर यांच्या शेताजवळ घडली. घटना घडल्यानंतर रामनाथ क्षिरसागर यांनी तातडीने वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर हर्षल गडगे, गणेश गायकवाड आणि तान्हाजी सांगळे यांनी घटनास्थळी धाव घेत झाडांच्या फांद्या तोडून वीजपुरवठा पूर्ववत केला. मात्र, आश्वी खुर्द उपकेंद्रातून हंगेवाडी व शेडगावकडे जाणाऱ्या मुख्य वीजवाहिन्यांवर मोठमोठ्या झाडांच्या फांद्या लोबंकळत असल्याने हा धोका कायम आहे.
वारा आणि पाऊस सुरू झाला की या फांद्या तारांवर घासून शॉर्ट सर्किट होते किंवा तारा तुटतात. याच मार्गावरून रोज शेतकरी, दूध उत्पादक आणि शालेय विद्यार्थी ये-जा करत असल्याने भविष्यात मोठ्या जीवितहानीची शक्यता वर्तवली जात आहे.
या गंभीर समस्येबाबत ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत, परंतु महावितरण आणि पाटबंधारे विभाग यांच्यातील अंतर्गत वादामुळे हा प्रश्न प्रलंबित आहे. महावितरण सदर झाडे पाटबंधारे विभागाच्या जागेत असल्याचे सांगून जबाबदारी झटकते, तर पाटबंधारे विभाग वीजवाहिन्यांची सुरक्षा ही महावितरणचे काम असल्याचे सांगते. या दोन्ही विभागांच्या ढकलाढकलीत सर्वसामान्य नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा संताप व्यक्त होत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता ग्रामस्थ थेट राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेणार असून, प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
घटनेनंतर तातडीने कर्मचारी पाठवून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र, वीजवाहिन्यांना अडथळा ठरणारी झाडे पूर्णपणे हटविण्यासाठी पाटबंधारे विभागाची अधिकृत परवानगी आवश्यक आहे. — अक्षय विखे (अभियंता, वीज वितरण कंपनी, आश्वी)
या धोकादायक झाडांबाबत अनेक वेळा लेखी व तोंडी मागणी करूनही प्रशासन दखल घेत नाही. भविष्यात जर एखादी मोठी दुर्घटना घडली, तर त्याला महावितरण आणि पाटबंधारे हे दोन्ही विभाग जबाबदार राहतील. प्रशासनाने नागरिकांच्या संयमाचा अंत न पाहता त्वरित कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. — सतीश गायकवाड (सामाजिक कार्यकर्ते, आश्वी खुर्द)
नऊ वर्षांपूर्वी याच निष्काळजीपणामुळे एका निष्पाप शेतकऱ्याचा बळी गेला होता. आता क्षिरसागर दाम्पत्य थोडक्यात बचावले आहे. प्रशासन आणखी किती लोकांचा जीव जाण्याची वाट पाहत आहे? हा निष्पाप लोकांच्या जिवाशी चाललेला खेळ थांबला पाहिजे. — कैलास गायकवाड (सामाजिक कार्यकर्ते, आश्वी खुर्द)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,449
जीव टांगणीला पाटबंधारे विभाग महावितरण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ हे नैराश्यावरील प्रभावी औषध; संगमनेरमध्ये व्याख्यानमालेचा उत्साहात शुभारंभ

23/08/2026

शिक्षित वस्तीच्या मध्यभागी अंधश्रद्धेचा अघोरी खेळ: संगमनेरमधील घुलेवाडीत तांत्रिक प्रकारांमुळे खळबळ, सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

22/08/2026

कुंभेफळ परिसरात बिबट्याची दहशत: ३ वर्षीय चिमुकल्यावर हल्ला, नागरिकांच्या प्रसंगावधानाने बालकाचे प्राण वाचले

22/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar25/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील खर्डा पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य…

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026

आज मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

25/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.