Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यात ११.७० लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण; मान्सून सक्रियतेमुळे खतांच्या मागणीत वाढीची शक्यता
महाराष्ट्र संवाद विशेष

राज्यात ११.७० लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण; मान्सून सक्रियतेमुळे खतांच्या मागणीत वाढीची शक्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्यातील पीक परिस्थिती, खते आणि बियाण्यांच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, दि. १७- विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असून, आतापर्यंत सुमारे ११.७० लाख हेक्टर शेतजमिनीवर पेरण्या झाल्याची माहिती आज (मंगळवारी) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्यातील पीक परिस्थिती, खते आणि बियाण्यांच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला.

राज्यात चांगला पाऊस झाल्यामुळे खतांची मागणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व प्रकारच्या खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. गरज भासल्यास तातडीने अधिक खतांची मागणी करावी, असेही ते म्हणाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात करण्यापूर्वी, अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी मंत्रिमंडळासमोर राज्यातील पीक-पाणी, खते आणि बियाणे पुरवठ्याबाबत सादरीकरण केले. त्यांनी सांगितले की, राज्याच्या जवळपास सर्वच भागांत मान्सून सक्रिय झाला आहे. यंदा आतापर्यंत ११.७० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या असल्या तरी, गेल्या वर्षीच्या १४५.८२ लाख हेक्टरच्या अंतिम पेरण्यांच्या तुलनेत हे प्रमाण सध्या केवळ सरासरी आठ टक्के आहे. काही भागांमध्ये सततच्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज्यातील पावसाच्या वितरणाबाबतही बैठकीत माहिती देण्यात आली. रस्तोगी यांनी दिलेल्या माहितीनुसार: १०० टक्क्यांहून अधिक पाऊस: अहिल्यानगर (अहमदनगर), पुणे, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), सोलापूर, सांगली आणि धाराशिव (उस्मानाबाद) या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. ७५ ते १०० टक्के पाऊस: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, सातारा, कोल्हापूर, जालना आणि लातूर जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला आहे. ५० ते ७५ टक्के पाऊस: ठाणे, रायगड, नाशिक, नांदेड, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

२५ ते ५० टक्के पाऊस: पालघर, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे. २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस: नंदुरबार, वर्धा, नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पुढील दोन ते चार दिवसांत चांगला पाऊस होण्याची शक्यता रस्तोगी यांनी व्यक्त केली.

जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सांगितले की, राज्यातील सर्व धरणांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ होत आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरण प्रकल्पाच्या मुख्य अभियंत्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी धरणात ५१५ मीटरपर्यंत पाणीसाठा करण्याची माहिती दिल्याचे नमूद केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 425
देवेंद्र फडणवीस पाऊस पेरण्या बैठक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: आगामी गणेशोत्सव भव्य, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार…

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.