Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या इतिहासात सोनेरी पान: पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जीवनकार्य आणि अमृत उद्योग समूहाचा सहकार आता विद्यार्थी अभ्यासणार!
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरच्या इतिहासात सोनेरी पान: पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जीवनकार्य आणि अमृत उद्योग समूहाचा सहकार आता विद्यार्थी अभ्यासणार!

सहकाराचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाल्याने ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये सहकाराविषयी अधिक आवड निर्माण होण्यास मदत होईल.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/06/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, प्रतिनिधी: 
संपूर्ण देशासाठी सहकाराचे आदर्श तत्त्वज्ञान आणि विचार देणारे स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे अमूल्य योगदान आणि त्यांच्या कार्याचा, तसेच राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली देशासाठी मार्गदर्शक ठरलेल्या अमृत उद्योग समूहातील सहकाराचा समावेश आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. येथील सहकार चळवळीचे महती आणि दूरदृष्टीचे महत्त्व अधोरेखित करणारी ही बाब संगमनेरच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान ठरली आहे. येथील सहकाराचा अभ्यासक्रमात समावेश संगमनेरकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची माहिती संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी दिली.
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार, वाणिज्य, विज्ञान आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांना आता संगमनेरमधील सहकाराचे हे महत्त्वपूर्ण पैलू अभ्यासता येणार आहेत. विशेष म्हणजे, एम.कॉम. अभ्यासक्रमातही स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांच्या जीवनकार्याचा समावेश करण्यात आला आहे.
सहकाराची गोडी वाढवण्यासाठी अभ्यासक्रमात समावेश…
ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागांमध्ये आर्थिक समृद्धी घडवून आणणारा ‘सहकार’ हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. विद्यार्थ्यांना या क्षेत्राची आवड निर्माण व्हावी यासाठी सहकार क्षेत्राचा विज्ञान आणि कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील सहकार क्षेत्रात मोठे काम केलेल्या दिग्गज नेत्यांचा समावेश असून, अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आता सहकारात आदर्श तत्त्वे आणि विचार देणारे स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जीवनकार्याचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता येणार आहे.
अमृत उद्योग समूहाचा आदर्श पॅटर्न आता अभ्यासणार…
द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेला आणि देशासाठी आदर्शवत ठरलेला संगमनेर येथील अमृत उद्योग समूहातील सहकार अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. यामध्ये थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी बँक, शेतकी संघ, अमृतवाहिनी शैक्षणिक संकुल, तसेच गावोगावी सहकारी संस्थांच्या माध्यमातून निर्माण झालेली आर्थिक समृद्धी आणि त्यातून साधलेला ग्रामीण विकास या सर्वांचा समावेश आहे.
सहकारी पतसंस्था आणि दूध संस्थांचा संगमनेर पॅटर्न हा राज्यासाठी एक मार्गदर्शक ठरला आहे. या पॅटर्नमुळे सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थिरता आणि समृद्धी आली आहे. अनेक ठिकाणी सहकार चळवळ अडचणीत असताना, माजी मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा सहकार मात्र देशासाठी एक दिशादर्शक उदाहरण म्हणून उभा राहिला आहे. या सहकाराचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाल्याने ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये सहकाराविषयी अधिक आवड निर्माण होण्यास मदत होईल.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, व्यवस्थापन परिषद सदस्य, विधानपरिषद सदस्य, विद्याशाखा सदस्य, आणि विविध अभ्यास मंडळाचे सर्व सदस्य यांच्या सामूहिक विचारातून विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासक्रमाचा समावेश केला गेला आहे.
संगमनेरसाठी अभिमानास्पद…
राज्यातील अनेक सहकार चळवळी अडचणीत असताना, संगमनेरचा सहकार मात्र सर्वांसाठी दिशादर्शक ठरला आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारात आर्थिक शिस्त, काटकसर, पारदर्शकता, दूरदृष्टी आणि आधुनिकता ही तत्त्वे रुजवली. याच तत्त्वांवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत उद्योग समूह कार्यरत आहे. अभ्यासक्रमात या निरोगी सहकाराचा समावेश झाल्याने राज्यातील सहकार क्षेत्र, अहिल्यानगर जिल्हा आणि सर्व संगमनेरकरांसाठी ही एक अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली आहे. – डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,434
विद्यापीठ अभ्यासक्रम सहकार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.