Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भंडारदरा धरणातून विसर्ग सुरू, रंधा धबधबा प्रवाहित; पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण
महाराष्ट्र संवाद विशेष

भंडारदरा धरणातून विसर्ग सुरू, रंधा धबधबा प्रवाहित; पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण

आदिवासी भागातील भातखाचरे पाण्याने भरल्यामुळे रोपे पाण्याखाली गेली आहेत, यामुळे पेरणीला उशीर होत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे बांध फुटले आहेत, ज्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अकोले, प्रतिनिधी: 

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे प्रसिद्ध रंधा धबधबा प्रवाहित झाला असून पर्यटकांसाठी हे एक आकर्षक ठिकाण बनले आहे.

भंडारदरा धरणातील पाणीसाठा आज ७४४१ दशलक्ष घनफूट (६७.४१%) झाला आहे. जलाशय परिचालन सूचीनुसार पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी, भंडारदरा धरणातून विद्युतगृहामार्फत ८४५ क्युसेक तर सांडव्याच्या (स्पील वे) गेटमधून १०५८ क्युसेक, असे एकूण १९०३ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक कमी-जास्त झाल्यास विसर्ग कमी-जास्त केला जाईल, असे शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी सांगितले. येत्या १५ जुलैपर्यंत धरणाची पाणीपातळी ६५% राखण्यात येणार आहे.

गेल्या दोन दिवसांपासून भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा चांगला जोर होता. पंधरा दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आता थांबेल असे वाटत असतानाच, सकाळपासून पुन्हा पावसाने कमी-जास्त प्रमाणात जोर धरला आहे. गत २४ तासांत भंडारदरा येथे ३० मिमी, घाटघर येथे ७४ मिमी, रतनवाडी येथे ६६ मिमी तर पांजरे येथे ५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या सततच्या पावसामुळे भंडारदरा धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

धरणातून पाणी सोडल्याने रंधा धबधबा प्रथमच पूर्ण क्षमतेने वाहत असल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भंडारदरा धरणातून सोडलेलं पाणी निळवंडे धरणात जमा होत असून सध्या निळवंडे धरणातून शेती सिंचनासाठी ९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, ज्यामुळे प्रवरा नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. तसेच, आढळा नदीवरील देवठाण धरण पूर्ण भरले असून, आढळा नदीपात्रातील पाण्याची पातळीही वाढली आहे. हे पाणी प्रवरा नदीला मिळणार आहे.

दरम्यान, मुळा परिसरात पावसाचा जोर वाढल्याने मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे आणि मुळा धरणातही चांगला पाणीसाठा जमा होत आहे. मात्र, आदिवासी भागातील भातखाचरे पाण्याने भरल्यामुळे रोपे पाण्याखाली गेली आहेत, यामुळे पेरणीला उशीर होत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे बांध फुटले आहेत, ज्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. रोपे खराब झाल्यास भात लागवड कशी होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,786
निसर्ग पर्यटक भंडारदरा धरण रंधा फॉल
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar09/10/20260

आजचे राशीभविष्य- मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला रासेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची…

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.