Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

27/08/2026

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026

५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच वेळी “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन करून नवा विश्वविक्रम

27/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गुरुपौर्णिमेनिमित्त डॉ. जयश्री थोरात यांचा संगमनेर-शिर्डी पायी दिंडीत सहभाग: साई भक्तांची सेवा
धार्मिक

गुरुपौर्णिमेनिमित्त डॉ. जयश्री थोरात यांचा संगमनेर-शिर्डी पायी दिंडीत सहभाग: साई भक्तांची सेवा

संगमनेरमधील युवक काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या दिंडीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन शिर्डीतील उत्सवात येणाऱ्या साई भक्तांची सेवा केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

जगप्रसिद्ध शिर्डी येथील श्री साईबाबांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित उत्सवासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने येणाऱ्या साई भक्तांच्या सेवेसाठी कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी संगमनेर ते शिर्डी पायी दिंडीत सक्रिय सहभाग घेतला. या दिंडीदरम्यान डॉ. थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध ठिकाणी साई भक्तांना सेवा पुरवली.

पुणे, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई विभागातून संगमनेरमार्गे शिर्डीला जाणाऱ्या अनेक दिंड्यांसोबत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पायी दिंडी काढली. या दिंडीत डॉ. जयश्री थोरात यांनी स्वतः पायी चालत, साई भजने गात सहभाग घेतला. विशेष म्हणजे, त्यांनी साई भक्तांना प्रसाद वाटप, आरोग्य तपासणी आणि इतर आवश्यक व्यवस्थांमध्येही सक्रिय योगदान दिले.

यावेळी बोलताना डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, श्रद्धा आणि सबुरीचे प्रतीक असलेले साईबाबा हे सर्वांचे श्रद्धास्थान आहेत. संगमनेर तालुक्यासह राज्यभरातील लाखो भक्तांची साईबाबांवर अलोट श्रद्धा आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत तीन दिवसांचा मोठा उत्सव असतो, यासाठी राज्यभरातून लाखो साईभक्त येत असतात. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या साई भक्तांना विविध सुविधा पुरवल्या जातात.

पायी दिंडी ही महाराष्ट्राची एक मोठी संस्कृती आहे, जिथे कोणताही भेदभाव नसतो. सर्व धर्म समभाव जपत सर्वजण एकमेकांना ‘माऊली’ म्हणून हाक मारतात. आषाढी श्रावणाच्या सरी, रिमझिम पाऊस, सर्वत्र हिरवळ आणि साईनामाचा गजर असा हा सुंदर सोहळा जीवनातील एक अविस्मरणीय ठेवा आहे, असे डॉ. थोरात यांनी सांगितले. दिंडीदरम्यान त्यांनी विविध ठिकाणी साई भक्तांना खिचडी आणि प्रसादाचे वाटप केले, तसेच अनेकांची आरोग्य तपासणी केली.

संगमनेरमधील युवक काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या दिंडीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन शिर्डीतील उत्सवात येणाऱ्या साई भक्तांची सेवा केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,159
जयश्री थोरात दिंडी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026

संगमनेरचा ईद ए मिलाद जुलूस शांततेत पार; आयोजक, नागरिक आणि पोलीस प्रशासनाचे कौतुक!

27/08/2026

संगमनेरमध्ये ‘बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा’चा ऐतिहासिक निर्णय; यंदा गणपती वर्गणीसाठी वापरणार ‘डिजिटल पावती ॲप’

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar27/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर शहरातील अवैध मावा आणि सुगंधीत तंबाखू बनविणाऱ्या…

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026

५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच वेळी “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन करून नवा विश्वविक्रम

27/08/2026

संगमनेरचा ईद ए मिलाद जुलूस शांततेत पार; आयोजक, नागरिक आणि पोलीस प्रशासनाचे कौतुक!

27/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.