Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त; कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी कारवाईचे आदेश
धार्मिक

शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त; कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी कारवाईचे आदेश

पंढरपूर येथील विठ्ठल देवस्थान आणि शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या धर्तीवर शनि शिंगणापूर मंदिराच्या संचालनासाठी लवकरच शासकीय समिती स्थापन केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त

मुंबई, विशेष प्रतिनिधी: 

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये कोट्यवधी रुपयांचे महाघोटाळे आणि बोगस भरती झाल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकारामुळे राज्य सरकारने मोठी कारवाई करत ट्रस्टचे सध्याचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत ही माहिती दिली, तसेच दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांची अपसंपदा जप्त केली जाईल, असे स्पष्ट केले. देवाच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

हा मुद्दा स्थानिक आमदार विठ्ठल लंघे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत मांडला होता. लंघे यांनी उघड केले की, ट्रस्टच्या विश्वस्तांनी बनावट ॲप्स तयार करून लाखो भाविकांकडून पूजेसाठी देणग्या स्वीकारल्या. तीन ते चार बनावट ॲप्सवर प्रत्येकी तीन ते चार लाख भाविकांनी पैसे पाठवल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, मोठ्या प्रमाणावर बोगस कर्मचाऱ्यांची भरती केल्याचा प्रकारही त्यांनी समोर आणला, ज्यामुळे सुमारे १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा त्यांनी केला. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी तर हा घोटाळा ५०० कोटी रुपयांपर्यंत असून, विश्वस्त दर आठवड्याला कोट्यवधींच्या जमिनी खरेदी करत असल्याचा आरोप केला.

बनावट ॲप्सद्वारे भक्तांची फसवणूक, २४४७ बोगस कर्मचारी!

मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सरकारी चौकशी समितीचा अहवाल सादर केला, यातील माहिती धक्कादायक होती. बनावट ॲप्सद्वारे जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्या विश्वस्तांच्या कार्यकर्त्यांच्या नावावर असलेल्या बँक खात्यांमध्ये परस्पर जमा होत होत्या. सायबर सेलच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, ज्या मंदिरात पूर्वी केवळ २५८ कर्मचारी असताना कारभार सुरळीत चालत होता, त्याच ट्रस्टने २,४४७ कर्मचाऱ्यांची भरती केल्याचे समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे, चौकशीत हे कर्मचारी प्रत्यक्षात अस्तित्वातच नसल्याचे आढळले.

घोटाळ्याची चौकशी बाहेरील अधिकाऱ्यांकडून; पंढरपूर, शिर्डीच्या धर्तीवर शासकीय समिती

या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून, घोटाळेबाजांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी बाहेरच्या अधिकाऱ्यांकडून केली जाईल, कारण यापूर्वी धर्मादाय आयुक्तालयाच्या एका अधिकाऱ्याने या सर्व गैरव्यवहारांना क्लीन चिट दिली होती. चुकीचा अहवाल देणाऱ्या त्या अधिकाऱ्याचीही चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पंढरपूर येथील विठ्ठल देवस्थान आणि शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या धर्तीवर शनि शिंगणापूर मंदिराच्या संचालनासाठी लवकरच शासकीय समिती स्थापन केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. यासाठी विधिमंडळाने कायदा केलेला असून, त्याची अंमलबजावणी लवकरच होईल, असे सांगत यापुढे मंदिरावर शासकीय नियंत्रण असेल असे संकेत त्यांनी दिले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,300
देवेंद्र फडणवीस बरखास्त महा घोटाळा शनिशिंगणापूर देवस्थान
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

आश्वी पोलिसांच्या दडपशाहीने विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न; गणेश मंडळांचा संताप, चौकशीची मागणी

26/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.