Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रमेश गुंजाळ राजहंस दूध संघाच्या संचालकपदी
शेती व सहकार

रमेश गुंजाळ राजहंस दूध संघाच्या संचालकपदी

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी दहा वर्षे यशस्वीपणे काम केले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त

संगमनेर, प्रतिनिधी: 

राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, सहकार क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या (राजहंस दूध संघ) संचालकपदी खांडगाव येथील रमेश लहानभाऊ गुंजाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

२५ जुलै २०२५ रोजी राजहंस दूध संघ येथे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. उपनिबंधक सहकारी संस्था संगमनेर तथा अध्यासी अधिकारी संतोष कोरे यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या संचालक मंडळातील रिक्त जागेवर गुंजाळ यांची एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, ज्येष्ठ संचालक लक्ष्मणराव कुटे, युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांच्यासह संघाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

रमेश गुंजाळ हे माजीमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने युवक संघटनेचे काम करत आहेत. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी दहा वर्षे यशस्वीपणे काम केले आहे.

या निवडीबद्दल बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यात दररोज नऊ लाख लिटर दूध उत्पादन होत असून, दूध हा तालुक्याचा मुख्य व्यवसाय बनला आहे. दूध व ऊस हे शाश्वत उत्पन्न असून, संगमनेर तालुका दूध संघाने शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणली आहे. रमेश गुंजाळ हे तरुण आणि उत्साही कार्यकर्ते असून, त्यांच्या अनुभवाचा संघाला नक्कीच फायदा होईल.

या निवडीबद्दल रमेश गुंजाळ यांनी बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एकनिष्ठेने समाज विकासाचे काम केले असून, यापुढेही राजहंस दूध संघाच्या माध्यमातून दूध वाढीसाठी आणि सहकारातून शेतकरी व गरजूंना मदत करण्यासाठी काम करत राहण्याचे आश्वासन दिले.

रमेश गुंजाळ यांच्या या निवडीबद्दल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,404
बाळासाहेब थोरात रमेश गुंजाळ राजहंस दूध संघ संचालक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.